Posts

Showing posts from April, 2023

महत्व

वाचनाचे महत्व मुलांसाठी   वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते. माणूस अशिक्षित राहिला, तर त्याची सगळीकडून  फसवणूक होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचार शक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो. समाजातील सर्वच शहरांच्या लोकांशी वागण्याची कला वाचनाने अवगत होते.  शिकलेल्या माणसाला आपली प्रगती करता येते. हल्लीचे पालक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप जागरूक असतात. त्यांना सुविधा आणि सुशिक्षित करण्याकडे, चांगले घडविण्याकडे त्यांचे लक्ष असते. मुलांच्या प्रगतीत पालकांचा वाटा असतोच. मुलांनी मागे न राहता जगाबरोबर धावावे, याकडे त्यांची धडपड असते, कल असतो. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ' वाचाल, तर वाचाल' हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश लक्षात ठेवला पाहिजे'

वाचन का करावे

*वाचन का करावे?* "पुस्तके कशाला वाचायची? पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही" "इतरांच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्यासाठी पुस्तके वाचावीत! त्या चुका आपण करून नये यासाठी!" "पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे. चुका करत करत शिकणे मला आवडते! माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! अनुभवातून!" "मान्य आहे. अरे पण, जीवनातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या चुकांतून शिकून शिकून त्यातील तत्वज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते. समजा तुला अनुभवातून शिकत शिकत एखादी गोष्ट समजली पण तोपर्यंत त्या अनुभवाचा उपयोग करण्याचे वय आणि वेळ निघून गेली असेल तर? आणि तुझ्या अनुभवातून आणि चुकांतून तू जो निष्कर्ष काढला तो जसाच्या तसा जर का या आधीच कुणी महान लेखकाने व्यवस्थित पुस्तकरूपात लिहून ठेवलेला असेल तर? तेवढा आपला वेळ नाही का वाचणार? एखादी चूक होण्यापूर्वीच आपण ती टाळू शकणार!" "पण लेखकाची आणि आपली पार्श्वभूमी, आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. लेखकाचे सगळे अनुभव आपल्याला कसे लागू होतील? सांग बरे?" "अरे! सगळे अनुभ...