वासुदेव

वासुदेव

एक मोरपिशी टोपी
एका हातामधे पावा
नाचणारा वासुदेव
कधीतरी आठवावा

चार आणे मुठीतून
घेत वाकायचा जेव्हा
मोरपिसांचा संभार
डोळ्यापुढे झुकायचा.

आणे हातात घेऊन
पुन्हा गाणे गात राही
बाळमनावर माझ्या
पीस थांबूनच राही

आठवणी अशा काही
रंग डोळ्यांवर निळा
चिमुकल्या स्वप्नांवर
जडे मोरपिशी डोळा

वासुदेवाची भूपाळी
बाळ-मुठीतले नाणे,
मोरपिस आणि पावा
मनी रुजवते गाणे 


सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*