मोडी लिपीचा इतिहास
मोडी लिपीचा इतिहास मोडी लिपी केव्हापासून सुरू झाली याबाबत इतिहास तज्ञांच्यात एकमत नाही. काही संशोधकांच्या मते या लिपीचा जन्म दोन हजार बर्षे इतका असावा. भारत मौर्य वंशाचे राजे चंद्रगुप्त, सम्राट अशोक यांच्या काळात मोडी अस्तित्वात आली असे मानते जाते. मौर्याची लिपी म्हणून तिला 'मोडी' म्हटले जाऊ लागले. मोडी लिपीत अपूर्ण वर्ण काढण्याची सोय नाही. त्यामुळे संयुक्त वर्ण बालबोधीप्रमाणे मोठ्या लिपीत बिनचूक लिहिता येत नाहीत. उदा. व्य'चे लेखन 'वय ' असे आढळते. त्याकाळात अशोक लिपी होती. त्यातही ऱ्हस्व दीर्घ व्यवस्था नसल्यामुळे अशेक लिपीची सुधारित आवृत्ती म्हणजे मोडी लिपी असे मानले गेले. दुसरे मत असे की, सुमारे सातशे वर्षे दक्षिण भारतात यादवांचे साम्राज्य होते. महादेवराव यादवांच्या कारकिर्दीत हेमांडपंत किंवा हेमाद्रीपंत नामक प्रख्यात प्रधानमंत्री होऊन गेला (इ.स. १२६०) हेमांडपंताचे मराठी भाषेवर अलोट प्रेम होते. त्यांनी मराठीत बरीचशी ग्रंथरचना केली असावी, असा तर्क तज्ञांचा आहे. परंतु त्यांचे ग्रंथ उपलब्ध नाहीत. खाजगी व राजकीय व्यवहारात लिहावयाच्या पत्राचे मायने कसे असावेत याबद्द...
Comments
Post a Comment