आई

आई तू असतीस तर....


आज तू असतीस तर... 
आई आज तू असतीस तर 
आज तीन पिढ्या मिळून (तू,मी, दिव्या)
खूप धमाल केली असती,
गेलो असतो खूप दूर दूर फिरायला .. 
तू असतीस तर, 
आई मी सुट्टी घेऊन साळगावला आले असते,
तू असतीस तर,
तू,मी, दिव्या तिघांनी मिळून काजवे पकडले असते 
लाईट बंद करून आपण काजवे बाटलीत भरून 
तिघांनी तिघांच्या आवडीची पुस्तके वाचली असती 
तू असतीस तर 
आज मी तुझ्या कुशीत  विसावले असते 
सगळ्या जगाला विसरून मस्त झोपले असते. 
आज तू असतीस तर
 तिघी मिळून गोवऱ्या थापल्या असत्या 
आज तू असतीस तर 
आपण एकमेकांच्या वेण्या घातल्या असत्या 
आज तू असतीस तर
 तिघी नववारी साडी नेसून देवदर्शनाला गेलो असतो 
आज तू असतीस तर 
पण ....तुलाही तुझ्या आईची आठवण आली असती ना???
मग मी तुझी आई झाले असते पण तू नाहीस असं वाटतच नाही 
तू आहेस तू तिथेच आहेस 
तू कायम माझ्या बरोबर आहेस 
आहेस ना आई !!!!


सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*