श्रावणमास
*विषय - श्रावणमास*
*ऋतुरंग फुलूनी आला मम जीवना*
*आषाढ श्रावण सरी बरसत घना*
*मेघ जमुनी आले या उंच अंबरा*
*कोसळती धरेवर रिमझिम जलधारा.(१)*
*हिरवा शालू परिधान करुनी सजली धरा*
*नवतरूनी नटली जशी भेटण्या वरा*
*नक्षी इंद्रधनुने तोरण बांधून अशी काढली*
*जणू चित्रकारी ही अवनीने रेखीली .(२)*
*श्रावणमास हा मम जीवनी आला*
*जगण्यास मज बेधुंद करुनी गेला*
*चोहीकडे पसरली ही हिरवी छाया*
*बहरता ऋतुराज मोहरे ही काया.(३)*
*सुगंधित झाली ही अवघी अवनी*
*जणू फोडली कोणी ही अत्तर दाणी*
*किमया कशी ही निसर्गात घडली*
*जादूगाराने छडी ही अशी फिरवली..(४)*
*हर्ष उल्हास हा आज मनी बहरला*
*सण उत्सव आनंद घेऊनी येती घरा*
*सृष्टी नटून थटून आली या भरा*
*श्रावणमासी ऋतुरंग हा जीवनी बहरला..(५)*
*सौ मनिषा राजन कडव*
Comments
Post a Comment