विश्र्वास
विश्वास
रेवापूर नावाच्या गावात एका मेंढपाळाकडे काही शेळ्या व गायी होत्या रोज सकाळ संध्याकाळ तो त्यांना चरायला घेऊन जात असे. चचचच असं उच्चारताच त्याच्या हाकेसरशी सर्व गुरे व मेंढ्या वाटेला लागत असत. मेंढ्यांना दुसर्याच्या शैतात बसविणे. गाईंचे दुध विकणे, शेती करणे, शेणखत विकणे हा त्याचा व्यवसाय होता. यातील एका शेळीने दोन जुळ्या शेळ्यांना जन्म दिला होता. दोन्ही बाळ गोंडस होती. जंगलात चरायला जाताना सगळ्यांन सोबत येत असत. . रोज गवत खाऊन झाल्यावर ते तळ्यावर पाणी पिऊन घरी जात असत. एके दिवशी हे सगळे जंगलातून गवत खाउन येत असताना. एका खड्ड्यातून वाचवा वाचवा तसा आवाज ऐकू येऊ लागला. तेव्हा या दोन्ही शेळीच्या पिल्लांनी त्या खड्य्यात वाकून पाहिले. तर त्यात एक कोल्हा पडला होता. त्यातील एका पिल्लाने त्याला विचारले तू आत कसा पडलास. तो म्हणाला यातील पाणी फार गोड आहे असं मला समजल म्हणून उडी मारली. तू पण बघ पिऊन त्या पिल्लाला पण गोड पाणी पिण्याची लालसा झाली आणि त्याने पाणी पिण्याचे ठरविले. त्याचा भाऊ त्याला मनाला तू या कोल्ह्यावर विश्वास ठेवू नको. मला असं मनातून वाटतयं हा विश्वास ठेवण्या योग्य नाही. पण त्या पिल्लाने आपल्या भावाचे ऐकले नाही आणि त्याने खड्यात उडी मारली..त्याने खड्यात उडी मारताच कोल्हा त्याच्या डोक्यावर पाय ठेवून वर उडी मारली स्वतःची सुटका करुन घेतली आणी धूम पळाला. पिल्लू मात्र त्याच्यावर विश्वास ठेवून फसल होत. म्हणूनच कोणाही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment