किमयागार.*

*किमयागार.*

लेखक- अच्युत गोडबोले. प्रकाशक- राजहंस प्रकाशन. प्रथमावृत्ती- जून 2007. नवी आवृत्ती- डिसेंबर 2016 (सहावी). पृष्ठसंख्या- 540. किंमत- रु.४५०.

हे पुस्तक म्हणजे अच्युत गोडबोले यांच्या विज्ञान प्रेमाचा एक सुंदर अविष्कार आहे. हे पुस्तक सुरु करताना मी जेव्हा प्रास्ताविक वाचत होतो एकदम भारवून गेलो. या प्रास्ताविकामध्ये गोडबोलेंनी या पुस्तक लिहिण्यामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे यामध्ये त्यांनी आपले लहानपणाचे काही अनुभव सांगितले आहे. परमेश्वर, देवपूजा, व्रतवैकल्ये या संकल्पना, पिढीजात चालत आलेल्या रूढी परंपरा आणि त्यामागे असणारी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचं मार्मिक विश्लेषण त्यांनी इथे केलेलं आहे. सत्यनारायणाच्या पुजेमागचे गौडबंगाल कळल्यानंतरचा परमेश्वरापासून दूर जाण्याचा त्यांचा प्रवास आणि विज्ञानाला तितकेच जवळ झाल्याचे जाण्याचे दिवस या सर्वांवर सुरेख विवेचन त्यांनी केलेलत आहे.

या पुस्तकामध्ये मुख्यत्वे करून दोन भाग आहेत पहिल्या भागामध्ये भौतिकशास्त्र व त्याच्याशी संबंधित विख्यात शास्त्रज्ञ यांची माहिती आहे र दुसर्‍या भागामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पृथ्वी विज्ञान यासंदर्भात व त्यांच्या शास्त्रज्ञाची माहिती दिलेली आहे. एक विज्ञानाचा विद्यार्थी या नात्याने हे पुस्तक वाचताना मला आनंदच होत गेला. गैलीलियो, न्यूटन, आइन्स्टाइन, रदरफोर्ड, मेरी क्युरी, डार्विन हे शास्त्रज्ञ मला माहीतच होते परंतु या पुस्तकाने मला इतरही शास्त्रज्ञांची ओळख करून दिली त्याचप्रमाणे big bang व black holes याविषयी चांगली माहिती मिळाली. 
हे पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे या शास्त्रज्ञांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. हा त्रास केवळ कौटुंबिक किंवा सामाजिकच नव्हता तर बऱ्यापैकी त्रास हा त्याकाळच्या प्रचलित धर्मसत्ता व धर्मसत्ताकांचा यांचा होता आणि या त्रासापोटी कित्येक शास्त्रज्ञांना आपले राहते घर राहता देश सोडावा लागला आणि कित्येकांना तर प्रसंगी मृत्यू दंडाला सामोरे जावे लागतले. परंतु असे असूनसुद्धा या शास्त्रज्ञांनी विज्ञानाची आस नी कास सोडली नाही. कितीतरी शास्त्रज्ञांना जिवंतपणी ज्या यातना सहन कराव्या लागल्या तितक्याच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मानसन्मान त्यांना मरणोत्तर मिळाले. परंतु या शास्त्रज्ञांनी कधीही प्रसिद्धी आणि पैशासाठी आपल्या ज्ञानाचा वापर केला नाही. या शास्त्रज्ञांनी मानवजातीच्या भल्यासाठी आणि त्याच्या उत्कर्षासाठी हा सगळा त्रास सहन केला.
जे वाचक शास्त्र शाखेशी संबधित नाहीत किंवा ज्यांना भौतिक शास्त्र/रसायन किंवा जीव शास्त्राची थोडीदेखील ओळख नाही त्यांना हे पुस्तक वाचताना थोडंस जड जाऊ शकेल परंतु ज्यांना शास्त्र आणि शास्त्रज्ञ जाणून घ्यायची इच्छा असेल त्यांनी हा अनुभव जरूर घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*