श्राद्धविधी का केले जातात.

श्राद्धविधी का केले जातात.



गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आणि त्यानंतर सुरू होतो पितृ पंधरवडा. या पंधरा दिवसांत पितरांच्या नावे दानधर्म, श्राद्ध केले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये जवळपास सर्वच धर्मांमध्ये श्राद्ध विधीला महत्व आहे. या काळात पितरांचे स्मरण करून श्राद्ध केल्यास पितरांना शांती मिळते. पितरांच्या आशीर्वादामुळे वंशजांच्या जीवनातील अडचणी दूर होत असल्याने या पंधरवड्यास अनन्यसाधारण महत्व आहे. विशेषतः महाराष्ट्रात तिथीनुसार श्राद्ध करण्याची प्रथा आहे. श्राद्धविधीमुळे केवळ पितर आणि वंशजांना समाधान मिळते एवढेच नव्हे तर यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. जाणून घेऊया काय आहेत ती. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपंधरवडा म्हणून ओळखला जातो. यास पितृपक्ष असेही म्हणतात. पितृपूजा ही धर्माच्या अनेक शाखांपैकी एक महत्त्वाची शाखा आहे. मृत पितरांच्या संबंधीच्या विधिसमूहाला पितृपूजा असे म्हणतात. पृथ्वीवरील सर्व प्राचीन व अर्वाचीन देशांत थोडया फार फरकाने पितृपूजेचे अस्तित्व आढळते.

श्रद्धेने केली जाणारी कोणतीही गोष्ट म्हणजे श्राद्ध, ही संकल्पना आपल्यापैकी किती जणांना माहीत असते?
दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध घालायचे ही परंपरा मुळात आली कुठून?  
श्राद्ध हा प्रामुख्याने ‘विधी’ म्हणून समाजात ओळखला जात असला तरी त्यापलीकडे एक वैशिष्टय़पूर्ण संकल्पना म्हणून तिचे महत्त्व विशेषत्वाने आहे. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण व पूजन करण्यासाठी प्राचीन धर्मशास्त्रकारांनी ही संकल्पना मांडली. विविध देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करणे, देवतांचे पूजन करणे यांसारख्या कृतींचे आचरण केले जाऊ लागले. त्याचप्रमाणे दिवंगत पूर्वजांच्या म्हणजेच पितरांच्या स्मरण-पूजनाची स्वतंत्र व्यवस्था श्राद्धाच्या माध्यमातून योजली गेली असावी.  
हिंदू धर्मसंस्कृतीतील प्राचीन ग्रंथ म्हणून मान्यता पावलेल्या संहितामध्ये पितरांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात. व्यक्तीच्या निधनानंतर केल्या जाणाऱ्या दहनकर्मप्रसंगी केलेल्या प्रार्थना ऋग्वेदामध्ये आहेत. मृत झालेल्या व्यक्तीला कोणताही त्रास न होता त्याच्या शरीराचे दहन व्यवस्थित पूर्ण व्हावे अशी भावना त्यामागे आहे. पितरांनी वैभवाचा उपभोग घ्यावा. पृथ्वीवरील भक्तांचे रक्षण करावे अशा प्रार्थनाही वैदिकांनी केल्या आहेत. यजुर्वेदामध्ये पितरांसाठी यज्ञामध्ये काही विशिष्ट आहुती देण्यास सांगितले गेले आहे. अथर्व वेदामध्ये पितरांना नमस्कारपूर्वक पिंड अर्पण करण्याचे सुचविले आहे.
देवतांप्रमाणेच आपल्या दिवंगत पूर्वजांबद्दल जो आदर वैदिकांच्या मनात होता त्याचे प्रकटीकरण करायला येथे सुरुवात झाली असावी. कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर पितरांकडून अभय, सुख, संतती, संपत्ती याची अपेक्षाही वैदिकांनी केलेली दिसते.
संहितामधील विविध संकल्पना ब्राह्मण ग्रंथ नावाच्या साहित्यातून व्यक्त केल्या गेल्या. शुक्ल यजुर्वेदाच्या काण्व शतपथ ब्राह्मण या ग्रंथाने पितरांसाठी स्वतंत्रपणे पिण्ड पितृ यज्ञ नावाचा विधी मांडला. या विधीमध्ये मांडल्या गेलेल्या सव्य-अपसव्याच्या संकल्पना आजही श्राद्ध विधीचा महत्त्वाचा भाग आहेत. िपड पितृ यज्ञाच्या माध्यमातून दिवंगत वडील, आजोबा, पणजोबा यांच्यासाठी िपड देणे, वस्त्राची दशी अर्पण करणे, अग्नीत आहुती देणे यांसारख्या क्रियाकलापांना प्रारंभ झाला.
गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे यांसारख्या वाङ्मयांमध्येही पितरांसाठी स्वतंत्रपणे करावयाच्या विधीची मांडणी केली गेली. विविध काळातील आश्वलायन, बौधायन गौतम इ. सूत्रकारांनी पितरांसाठी विधीचे स्वरूप वर्णन केले. या विधीच्या जोडीनेच श्राद्धप्रसंगी कुलीन, वेदज्ञ, सदाचारी ब्राह्मणांना भोजनास बोलविण्याची संकल्पना पुढे आली. या जोडीने अशौच विचार म्हणजेच सुतकाची संकल्पनाही मांडली गेली.
 मनुष्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याचे पुढे काय होते यासंबंधींच्या कल्पना निरनिराळ्या लोकांमध्ये निरनिराळ्या तऱ्हेने आढळून येतात. मृत मनुष्य पृथ्वीवरून जरी नाहीसा झाला तरी दुसऱ्या एखाद्या लोकांत वास करतो, अशी कल्पना बहुतेक लोकांत आढळते. त्याच कल्पनेतून पितृपक्षाची निर्मिती झाली. परंतु त्यामागे शास्त्रीय कारणही सांगितले जाते. प्रत्येक झाड प्राणवायूचे उत्सर्जन करत असते. परंतु वड आणि पिंपळ हे दोन वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने प्राणवायू उत्सर्जित करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. त्यामुळे या दोन झाडांना अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना त्यांना देवाचा दर्जा दिला आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारे मनुष्य लावू शकतो. परंतु, फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीजनिर्मिती होऊ शकत नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा कावळे खातात, (केवळ कावळेच, इतर कोणताही पक्षी नाही) तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ वृक्ष उगवतात.कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत किंबहुना आपल्याला वड आणि पिंपळ वृक्ष वाढवायचे असतील तर कावळ्यांचे संवर्धन सर्वांत महत्वाचे आहे. कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे या काळात प्रत्येकाने त्यांना घरोघरी पोषक आहार दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीचे संत, शास्त्रकारांनी जाणले होते. आपल्या संस्कृतीतील ऋषि-मुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोन झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठी पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. त्यासाठीच पितृपंधरवड्याची निर्मीती करण्यात आली. अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळी संकल्पना पितरांची कल्पना मान्य केल्यावर असा प्रश्न उद्भवतो की पितरांचा पृथ्वीवरील जिवंत प्राण्यांशी व त्यातल्या त्यात आपल्या आप्तेष्टांशी संबंध येऊ शकतो किंवा नाही; व संबंध असला तर तो कोणत्या प्रकारचा असू शकेल. पुष्कळ लोकांत अशी समजूत आढळते की पितर मृत्यूनंतर आपल्या घराण्याशी चांगल्या रीतीचा संबंध ठेवतात, आपल्या घराण्यांतील माणसांचे अगर आप्तेष्टांचे कल्याण करण्यासाठी झटतात व आपल्या घराण्याविरुद्ध असलेल्या शत्रूंचा नाश करण्याचा प्रयत्न करतात. याउलट काही जाती व राष्ट्रांमध्ये अशी कल्पना प्रचलित आढळते की पितर आप्तेष्टांशी व आपल्या माणसांशीही चांगल्या तऱ्हेने वागत नाहीत. त्यामुळे ज्या ज्या जातीची पितरांसंबंधींची जशी चांगली अगर वाईट कल्पना असेल त्या त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये पितृपूजेच्या विधींमध्ये फरक आढळतात.




सौ. मनिषा राजन कडव
१६/ ए ओमशिवमकृपा को.हौ. सो 
गुरुनानक शाळेजवळ,  रामबाग ४
कल्याण ( पश्चिम) ४२१३०१

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*