Posts

Showing posts from December, 2023

माणदेशी माणसं

Image
माणदेशी माणसं  माणदेशी माणसं हा व्यंकटेश माडगूळकरांचा सर्वात पहिला कथासंग्रह. माणदेशातल्या साध्या, सरळ आणि कष्टकरी माणसांची ही शब्दचित्र इतकी हुबेहूब आणि सुंदररित्या रंगवली आहेत, की वाचताना ती आपल्यासमोर उभी राहतात. अगदी आजही. आता हा ‘झेल्या’च बघा. ‘बटन नसले्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच. वयानंही फारसा नसावा. तेरा-चौदा एवढा. डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी. अंगात कसले कसले डाग पडलेलं, मळलेलं, बाहीवर ठिगळ लावलेलं हातमागाच्या कापडाचं कुडतं; त्याला शोभेलशीच तांबड्या रंगाची चौकडी असलेली गादीपाटाची चड्डी! तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले. त्यांत बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात.’ आधीच्या मारकुट्या मास्तरांनी हिरवेनिळे वळ उटेपर्यंत मारल्यामुळे शाळेकडे न फिरकणारा व नवीन मास्तरांच्या प्रेमळ वागणुकीवर खुश होऊन नियमित शाळेत येणारा आणि त्यांना जीव लावणारा झेल्या किती सुंदर रेखाटला आहे. माडगूळकरांनी फक्त मानवी स्वभाव नाहीतर त्याकाळची सामाजिक परिस्थिती देखील उत्तम प्रकारे रेखाटली आहे. ती वाचताना कधी हसायला येतं, कधी राग येतो; तर कधी...

मातीखालची माती

Image
मातीखालची माती ग्रामीण वास्तव जीवनाला नकळत झालेला स्पर्श... नाविन्यपूर्ण नावाने प्रकाशित झालेला हा व्यक्तिचित्रांचा संग्रह ग्रामीण स्वभावचित्रांचे विविध दर्शन घडविणारा आहे. ‘मातीखालची माती ओली आणि उबदार असते... तिच्या उबीतच पिकं जीव धरतात’ आईच्या एका सहज बोलून गेलल्या वाक्यांतून ह्या संग्रहाला वेदनाशील मनाचे अंकुर फुटले आहेत असं भासतं. हातबुडी आलेला शिवा, चव्हाणांचा आबामा, बापू, आक्कू मावशी, गडी, सखाराम, बाबाजी बल्लाळ, फुलाआत्ती, भाडेकरु दत्तू, पोरका दिन्या, तपस्विनी, धोंडबा खादाड्या, खुळा इठू आणि लंगडा गोपा अशा चौदा व्यक्तिरेखांतून दर्शन घेतलंसं वाटतं एका सलंग खेडे गांवाचं - जिथं उंस पिकतो आहे-तितक्याच शिव्याही पिकताहेत, उधळल्या जात आहेत. ग्रामीण जीवनांतील विविध कथा मराठी साहित्यांत चांगल्याच रुजल्या आहेत, ‘खेड्यांत चला’ ह्या ग्रामोद्धाराच्या संदेशापाठोपाठच ग्रामीण कथांना आगळे महत्व आलें. शहरातल्या यांत्रिक जीवनाला कंटाळलेल्या मुळच्या ग्रामीण मनाला मूळ गावच्या व्यक्तिचित्रांचा आठव सुखद गुदगुदल्या करून जाणे स्वाभाविक होतं. भोळ्या-भाबड्या शेतकरी कुटुंबाच्या कथा निसर्गरम्य पर...

बनगरवाडी

Image
बनगरवाडी" शाळेत जाण्यापेक्षा मुलांनी मेंढरामागे जावे या ठाम मतांचा पालकवर्ग असलेल्या बनगरवाडीत कादंबरीचा तरुण नायक राजाराम विठ्ठल सौंदणीकर नव्यानेच शिक्षक म्हणून दाखल होतो आणि येथूनच सुरु होते "बनगरवाडी" च्या कथेचा प्रवास. लेखक व्यंकटेश माडगूळकर यांना आलेल्या अनुभवावर आधारीत असलेली "बनगरवाडी" ही कादंबरी माणदेशातल्या 'लेंगरवाडी' नावाच्या वाडीवर बेतलेली आहे. प्रथम ही कादंबरी १९५५ साली प्रकाशित झाली. त्यानंतर आतापर्यंत तीचे बारा भाषेत अनुवाद करण्यात अ‍ाले आहे. बनगरवाडी कथानकावर १९९५ साली अमोल पालेकर दिग्दर्शित एक मराठी चित्रपटही प्रदर्शित झालेला आहे.  मास्तर गावात दाखल होताच त्याला बालट्याच्या धमकीचा सामना करावा लागतो. हे घडत असताना बनगरवाडीतील म्हाताऱ्या कारभाऱ्याची त्याला साथ मिळते आणि तो त्याक्षणी स्थिरावतो. कादंबरीच्या सुरुवातीलाच हे प्रसंग वाचत असताना कादंबरीमधील रांगड्या गावरान भाषेचा अंदाज येतो. आणि त्य‌ा भाषेसह वाचक उत्कंठेसह पुढे सरकतो.... आधीच म्हंटल्याप्रमाणे मुल‍ांनी शाळेत न जाता मेंढरामागे जावे ह्या मताच्या एका ओसाड माळ...