शोध एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा… ‘रिचर्ड फाईमन*

सदर - *पुस्तके उलगडताना* करिता


*शोध एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा… ‘रिचर्ड फाईमन*


शोध एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा… ‘रिचर्ड फाईमन’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकात सुधा रिसबूड यांनी फिजिक्सचे नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाईमन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. फाईनमन यांचे केवळ चरित्र नाही, तर फाईनमन ही व्य्ती म्हणजे काय रसायन होतं, हे या पुस्तकातील प्रसंगावरून कळून येतं. या पुस्तकातील एकूण २५ प्रकरणातून त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग यात शब्दबद्ध करण्यात आले आहेत. ‘रिचर्ड फाईनमन एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व’ या प्रकरणात फाईनमनच्या विज्ञानविषयक कर्तृत्वाचा वेध घेण्यात आला आहे. त्यांना जीवनाबद्दल विलक्षण ओढ होती. नवनवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास होता. बुद्धीनं अत्यंत तल्लख, दांडगी विचारशक्ती, तर्कशुद्धता, गणिताची आणि फिजिक्सची मनातली घट्ट बैठक यामुळे फाईनमन हे द्रष्टे होते. आजचे युग हे नॅनो टेक्नॉलॉजीचे आहे. या क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहेत. संगणक्षेत्र, जैविकशास्त्र, रसायनशास्त्र या क्षेत्रात नॅनो टेक्नॉलॉजी उपयोगी पडू शकते हे फाईनमन यांनी १९५९सालीचे सांगितले होते. १९६९साली फिजिक्स विषयात नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या या शास्त्रज्ञाला चित्रकला, ड्रम वाजवण्याचा छंद होता. ‘विज्ञानाचे वैश्विक नाते’ यामध्ये त्यांच्या भौतिकशास्त्र विषयाचं संशोधन कार्य व शैक्षणिक कार्याचा वेध घेतलेला आहे. फिजिक्स शिकवण्यात आणि फिजिक्समध्ये संशोधन करण्यातच त्यांनी आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानली. प्रचंड मानधन मिळणारी नोकरीही त्यांनी नाकारली. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञांची पिढी निर्माण करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. विश्वाच्या रहस्याचे नियम हे भौतिकशास्त्राच्या अभ्यासातून कळू शकतील, असे त्यांचे मत होते. विश्वाची उत्पत्ती किंवा विश्वाचे रहस्य अजून शास्त्रज्ञाला विज्ञानाला कळलेलं नाही हे मान्य करायला फाईनमनना कधीच कमीपणा वाटला नाही. ‘फ्रेंच कव्र्ह आणि कॅलक्युलसचा अभ्यास’ हे प्रकरण फाईनमनच्या शालेय जीवनातील शिक्षणाच्या पद्धती उलगडून दाखवते. त्यांचे कॅलक्युलस शालेय जीवनापासून चांगले होते. पुस्तकी ज्ञानाची घोकंपट्टी त्यांनी कधी केली नाही. त्यांच्या याच वृत्तीमुळेच क्वांटम फिजिक्समध्ये त्यांनी नवे दालन उघडले. फाईनमन डायग्रॅममुळे आईनस्टाईननंतर एका वळणावर येऊन थबकलेल्या भौतिकशास्त्राला फाईनमननी गती दिली. ‘वैद्यकीय तपासणी’ या प्रकरणात त्यांच्या खट्याळ स्वभावाचा मजेदार किस्सा सांगण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैन्य प्रवेशाकरता फाईनमनना वैद्यकीय चाचणीत मानसिकदृष्ट्या ‘अनफिट’ म्हणजे चक्क वेडगळ ठरण्यात आले होते. अत्यंत मिस्कील व खोडकर वृत्तीचे फाईनमन विज्ञानाविषयी बोलताना मात्र गंभीर होत. ‘फिजिक्समध्ये आकंठ बुडलेले फाईनमन’ या प्रकरणात फाईनमनच्या विज्ञानविषयक विचारांचा ऊहापोह करण्यात आला आहे. विज्ञान म्हणजे नेमकं काय, हेही त्यांनी सांगितलं आहे. माणसांनी जोपासलेल्या अंधश्रद्धांचं जंजाळ, साचलेलं अतिरिक्त अनावश्यक माहितीचं जाळं दूर करण्याची युक्तीही त्यांनी शोधून काढली आहे. ही युक्ती म्हणजे चिकित्सा होय. नवीन प्रत्यक्ष केलेल्या प्रयोगाचा अनुभव हा पुनःपुन्हा तपासून घेता येणे म्हणजे विज्ञान होय. वैज्ञानिक सिद्धांताला शास्त्रीय प्रयोगाची जोड असली पाहिजे, असेही त्यानंी आग्रहाने सांगितले आहे. शास्त्रीय सत्य हे सगळ्यांना सारखेच निष्कर्ष देते, हे फाईनमन यांनी आयुष्यभर आग्रहाने सांगितले. फाईनमन हे शोधक वृत्तीचे, सृजनशील प्रज्ञावंत होते. स्वत:ला बुद्धीला चालना देण्यासाठी भौतिकशास्त्रातील काही गोष्टींची कारणमीमांसा शोधून काढण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. थाळी पेâकण्याच्या खेळातली थाळीच्या गतीच्या अभ्यासावर जोर दिला. यातूनच क्वांटम इलेक्ट्रोयनमिकल शाखेचा जन्म झाला. ‘बहूभाषिक प्राध्यापक’ या प्रकरणात फाईनमनच्या बहुभाषिकत्वाचा ऊहापोह करण्यात आला आहे. जपान येथे एक सेमिनारमध्ये भाग घेण्यासाठी ते जपानला गेले. त्यांनी जपानी भाषा आत्मसात केली. त्यासाठी त्यांनी जपानी महिलेकडून जपानी भाषा शिकण्यासाठी वर्ग सुरु केले. ब्राझीलमध्ये असताना पोर्तुगिज भाषा आत्मसातकेली. ते हजरजबाबी स्वभावाचे होते. सरकार दरबारी लाल फितीचा तिटकारा हा त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा एक भाग होता. ‘तेरा वेळा सह्या’ या प्रसंगातून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू दर्शवला आहे. क्वांटम डायनॅमिक्स या शाखेव्यतिरिक्त, द्रवरूप हेलिअमवरील कामासाठीही फाईनमननी केलेल्या कामाचा परिचय ‘सांस्कृतिक किनार’ या प्रकरणात केला आहे. मय लिपीतील खुणा, दंड, उभ्या रेखा, टिंब इत्यादी आकाराचे त्यांनी अर्थ लावले. या खुणा ग्रहांच्या परिभ्रमण कक्षा, ग्रहांच्या कला यांच्याशी निगडित असलेली ही निरीक्षणे आहेत, हेही त्यांनी दाखवून दिले. त्यांनी केवळ हौसेखातर केलेल्या अभ्यासातून मय संस्कृतीची बरीच माहिती जगापुढे आणली.

फाईनमन हे असेच द्रष्टे शास्त्रज्ञ होते. भौतिकशास्त्राचा गाढा अभ्यास, शास्त्रीय विचारांची पक्की बैठक आणि विलक्षण बुद्धिमत्ता यामुळे भौतिकशास्त्रतच नव्हे; तर विज्ञानाच्या कुठल्या क्षेत्रात कशाप्रकारे प्रगती होईल किंवा होऊ शकते हे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे. त्यांना क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्समधील सिद्धान्ताबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी तयार केलेल्या फाईनमन डायग्रॅममुळे भौतिकशास्त्राच्या शास्त्रज्ञांना सूक्ष्म कणांचे स्थलकालातील परस्पर संबंध समजून घेता आले. अत्यंत उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांनी ख्याती होती. त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे आणि स्पष्टोक्तीमुळे सरकार मानसन्मानाच्या नादी ते लागले नाहीत. फाईनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स हे त्यांची फिजिक्स विषयावरील पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकामुळे त्यांना फिजिक्सचे निष्णात शिक्षक मानले जाते. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ऑरस्टेट मॉडेल हा सन्मानही मिळाला. ‘द कॅरॅक्टर ऑफ फिजिक्स लॉ अँड क्युईडी स्टॅटिस्किट मेकॅनिक्स लेक्चर्स ऑन ग्रॅव्हिटी ही त्यांची गाजलेली काही पुस्तके. नॅनो टेक्नोलॉजीचे महत्त्व शास्त्रज्ञांच्या अभ्यासकांच्या लक्षात आणून देणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यामधील कित्येक रहस्ये ही नॅनो टेक्नॉलॉजीच्या अणूच्या पातळीवर जाऊश्र अभ्यास करण्याच्या प्रयत्नांतून सुटतील अशी या द्रष्ट्या शास्त्रज्ञाची दूरदृष्टी होती. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या या शास्त्रज्ञाच्या आत कुठेतरी एक खट्याळ मूल दडलेले होते याचा प्रत्यय हे चरित्र वाचताना येतो. फाईनमननी संशोधन आणि शिक्षणक्षेत्रातील आपला प्रमाणिकपणा सातत्यानं टिकवला. जीवनातील विविध अनुभवांना ते निखळ मिस्किलतेने सामोरे गेले. विज्ञान क्षेत्रात चिकित्सक वृत्ती जागृत ठेवणारे शिक्षण असे मानून त्याचा पाठपुरावा विद्याथ्र्यांना करायला लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे चरित्र सुधा रिसबूड यांनी कलात्मकरीत्या, सोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडले आहे वाचकांना हे चरित्र आवडले.





रिचर्ड फेनमन : एक हरहुनरी व्यक्तिमतत्व
लेखिका  - सुधा रिसबुड
 ISBN : ९७८८१८४९८४५१४
 आवृत्ती : २
 प्रकाशन वर्ष : जानेवारी २०१३
 पृष्ठे : १३२
 श्रेणी : चरित्र
 मुल्य - १५०/-








सोबत पुस्तकाचे मुखपृष्ठ छायाचित्र.




सौ. मनिषा राजन कडव
१६/एक, ओमशिवमकृपा को.हौ.सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग-४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*