Posts

Showing posts from June, 2024

कुडाळचो बाजार

कुडाळचो बाजार बाबलो खूप वर्षानी गावाकडे गेलो.  तशी गावाची ओढ मेल्याक भरपूर.  पण नोकरी नोकरी धंद्यामुळे जावक गावा नाय. आवस म्हणायची तेका.  "सगळ्यांचे झिल येतत , पण तुकाच सुट्टी नसता.  काय सांगतलो बिचारो आवसीक काय माहित गावाकडे घरच्या तांदळाच्या पेजेवर दिवस काढूक येतत पण मुंबैक दोन पोरांका पोसणा किती कठिण आसा .   बाबलो आता मुद्दाम सुट्टी काढून इलेलो तेका कारण होता.  पोरा आता थोडी मोठी झालेली होती.  माॅल मधे फिराक लागली .  माॅलमधे गेला काय स्वस्त वस्तूच्या नावाखाली किती पैसे उडतत.  म्हणान गावाकडचे माॅल कसे आसत .  गावाकडचा जीवन तेका पोरांका दाखवचा होता. बाबलो  तसो साधो माणूस गोल तोंडांचो ,साधारण पाच सहा फुट उंचीचो पण सावळ्या रंगाचो बाबलो सगळ्यात उठान दिसा.  खूप बोलको नसलो तरी सगळ्यांका मदतीक धावणारो त्यामुळे वाडीवरच्या लोकांमध्ये सगळ्यांच्या आवडीचो .   बाबलो वाडीवरच्या शाळेत दहावी झालो आणी नंतर कुडाळाच्या कालेजात जावन बारावी पर्यंत शिकलो.  पण पोर गुणाचो हा. खूप मेहनती. जांभळा ,करणाच्या दिवसात डोक्यावरून फाटी नेऊ...