कुडाळचो बाजार

कुडाळचो बाजार
बाबलो खूप वर्षानी गावाकडे गेलो.  तशी गावाची ओढ मेल्याक भरपूर.  पण नोकरी
नोकरी धंद्यामुळे जावक गावा नाय. आवस म्हणायची तेका.  "सगळ्यांचे झिल येतत , पण तुकाच सुट्टी नसता.  काय सांगतलो बिचारो आवसीक काय माहित गावाकडे घरच्या तांदळाच्या पेजेवर दिवस काढूक येतत पण मुंबैक दोन पोरांका पोसणा किती कठिण आसा .   बाबलो आता मुद्दाम सुट्टी काढून इलेलो तेका कारण होता.  पोरा आता थोडी मोठी झालेली होती.  माॅल मधे फिराक लागली .  माॅलमधे गेला काय स्वस्त वस्तूच्या नावाखाली किती पैसे उडतत.  म्हणान गावाकडचे माॅल कसे आसत .  गावाकडचा जीवन तेका पोरांका दाखवचा होता. बाबलो  तसो साधो माणूस गोल तोंडांचो ,साधारण पाच सहा फुट उंचीचो पण सावळ्या रंगाचो बाबलो सगळ्यात उठान दिसा.  खूप बोलको नसलो तरी सगळ्यांका मदतीक धावणारो त्यामुळे वाडीवरच्या लोकांमध्ये सगळ्यांच्या आवडीचो .   बाबलो वाडीवरच्या शाळेत दहावी झालो आणी नंतर कुडाळाच्या कालेजात जावन बारावी पर्यंत शिकलो.  पण पोर गुणाचो हा. खूप मेहनती. जांभळा ,करणाच्या दिवसात डोक्यावरून फाटी नेऊन तो कुडाळच्या बाजारात नेवन विकी. बाबलो मेहनत करून शिकललो.  त्याच्या बापाशीन तो बारावी झाल्यार तेका काकाकडे मूबैंक पाठवलान.
बाबलो मुंबैक गेलो. नोकरी लागली आणी
लगीन झाला . पोरा झाली आणी बाबलो थयसरच रमलो. मदे मदे बाबलो गावाक  येय पण चार दिवस रवान परत मुबैंक जाय. इतक्या वर्षात तो गावाक इलो तरी कधी तो बाजाराक जावक नाय.  आज बाबलो इतक्या वर्षानी बाजाराक गेलो.  पुर्वी गावात ता शर्ट आणी पँन्ट घालून जाणारो बाबलो आज मात्र मस्तपैकी इस्त्रीचा टिशर्ट आणी जिन्स घालून अत्तर मारुन बाजाराक जावक निघालो. तिठ्यावर इल्यार तेका गावड्यांचो राजगो दिसलो .  बाबल्यान तेका हाक मारलान ए राजग्या .  राजग्यान हाळी तर एॅकल्यान पण कोणी हाळि दिली तेका कळना.  मेलो हडे तडे शोधूक लागलो..  पण तेका कळना कोण हाळी मारता तो.  तेवढ्यात? बाबलो चलत चलत राजग्याच्या समोर येवन उभो रवलो.
     राजगो बिचारो भियान कोण ह्यो, सायब म्हणान बाजूक झालो.  "मेल्या मायजया माका, ओळखाक नाय ?
राजगो म्हणालो, "नाय बाबा, कोण तुम्ही?
अरे मिया बाबलो ओळखाक नाय मायझह्या कोकणात शब्दा शब्दा गणिक शिव्या घालायची सवयच आहे.  राजगो म्हणालो नाय बाबा ओळखाक.  अरे मिया बाबलो धर्ण्यांचो . राजगो तोंडावर हात ठेवन बघीतच रवलो.  मेल्या बाबल्या तियातर विंग्रजी सायबा सारखोच दिसाक लागलस मरे.  केवा इलस गावाक .  अरे तिया नोकरेक म्हणान गेलस तेवा पासून गावाची आठवण येत नव्हती काय मेल्या.  रवांदे रे बाबा ता तिया पयलो माका बाजाराक घेवन चलं .  चल गाडी काढ तुझी.  ति बघ माझी माजी चडवा ईलीत तेंका बाजार दाखवचो आसा कसो असता तोराजग्याच्या गाडयेत बसान   बाबलो आणी त्येची चडवा निघाली.  पण बाबल्याच्या चेडवांची तोंडा बघण्या लायक होती.  पोरा आंग चोरून बसलेली.  गाडी कुडाळच्या एस.टी.स्टँडपासून लांब उभी रवली.  तसो बाबलो पोरांका म्हणता आता उतरा खाली.  इथून चालत जावं लागेल आपल्याला.  त्यावर पोरा म्हणाक लागली.  पप्पा इम्हाला कुठं आणलत तुम्ही ते सजळे पॅसेंजर कसे चिटकून बसलेले अजीबात नीट जागा नव्हती बसायला. यावर बाबलो म्हणालो .इथे गावी असचं असत. इथे जास्त वाहतुकीची साधने नाहीत त्यामूळे असाचप्रवास करावा लागतो.बाबल्याचो एकदाचो कुडाळच्या बाजारपेठेत शिरलो .  आणी बाबल्याक धक्कोच बसलो आधीचो बाजार आणी आताचो कुडाळचो बाजार यात जमिन अस्मानाचो फरक होतो.
बाबल्यान चडवाकां सांगीतलान ह्यो आमचो गावाकडचो माॅल. चडवा बाबल्याच्या तोंडाकडे बघितच रवली. आता बाबल्याच्या लहानपणीचो कुडाळचो बाजार आणी आताचो बाजार याच्यात खूप फरक पडलो होतो.  आताच्या रस्त्याच्या दोनय बाजूनी दुकाना झाली होती. आणी कानडी लोकांची खारी बटराची दुकाना उघडलेली.  बाबल्याक खालच्या आळीतील मयग्याची आवसं वाली आणी पाल्याची भाजी विकूक बसलेली दिसली.  बाबल्याक आठवला तो आणी तेची आवस पण जांभळा करणाची फाटी असेच विकूच्या साठी कुडाळच्या घेऊन येयत.  बाबल्याक आठवला पुर्वी तेंचे ह्या असा विकल्या शिवाय घरात दोन येळचा खाऊक सुध्दा मिळा नाय.
बाबल्याच्या डोळ्यात पाणी ईला.  बाकी या दुकाना व्यतिरिक्त बाकीचो बाजार तसोच होतो.बाबाल्याक कुडाळच्या बाजारात शिरता शिरता अण्णांचा भज्याचा दुकान दिसला आणी बाबलो उडी मारून दुकानात शिरलो.  बाबल्याक भज्याच्या वासान जोराची भूक लागली होती.  दुकानात शिरता शिरता बाबल्यान आॅर्डर घेणार्‍या पोराक  आॅर्डर सोडलान तिन प्लेट कांदाभजी आणी  एक स्फेशल चाय पटकन. आॅर्डर दिल्यान आणी बाबलो आजूबाजूक बघूक लागला तर तो पोरांका सोडूनच रस्त्यावर सोडूनच दुकानात घूसलेलो. पण नशिब ती पोरा बापाशिचो ह्यो अवतार बघून अवाक झालेली .  आणी धावत धावत बापाशिच्या पाटसून धावत इली.  बाबल्यानं भजी खात खात हळूहळू आजूबाजेचे गोष्टी एकाक लागल्यो.  आजूबाजूच्या लोक हळूहळू गोष्टी करीत होते.  बाजार म्हणजे असल्या गोष्टीका उत येता बाबलो ता सगळा ऐकत होतो.  ता परबांचा प्यार सोमवारी घरातून पळान गेला.   त्या बाबा टीळयाच्या पोरान कोणाची पोरगी करून हाडलान देवाक ठाऊक बाबल्यान हे गजाली आयकलान आणी मनातच म्हटलान मेले दुसर्‍यांचे चावट गजाली करना कधिच सोडूचे नाय. बाबल्यान पुढे चलताना बघलान तर तेच्या लहानपणीची सगळी माटेकर मिसळ,सुप्रसाद कोल्ड्रिंक्स,बाळ कृष्ण कोल्ड्रिंक्स,धडाम,मयूर( शिरसाट कापड दुकान) ही सगळी दुकाना जशीच्या तशी होती.  थोडो फार काळानुसार बदल झालेलो.शिरसाट मसाल्यांचा दुकान तसाचा तसाच होता .  मसाल्यांचो वास नाकातोंडात तसोच्या तसो घूसत होतो.  वास घेऊन बाबल्याक मटणाची आठवण झाली .  बाबल्यान दुकानातून मटणोचो अर्धाकिलो मसालो घेतलान. पुढे जाताना एक म्हातारी बाई सुरंगीचो वळेसार,आबोलेचो वळेसार,ओवाळाचो वळेसार येगयेगळी चाफी घेवन बसलेली बाबल्यान आवशीक आणी बायलेक वळेसार घेतलान. आणी आवशी कितीगे पैसे झाले . म्हातारेन सांगलान ऐंशी रूपये लेका.  बाबलो म्हणालो आवशी कायतरी कमी कर . तीया समजान दे झिला.  कोकणातल्या लोकांची एक सवय बरी आसा ती कधी चिडणतं नाय आणी पैशाक लोभिय नाय. बाबल्यान त्या म्हातारेकडे बघून तिचा वय बघून ऐशीच्या ऐवजी शंभरची नोट दिलान म्हातारी विस रूपये वापस द्यायला लागल्यावर रवांदे गे आवशी विस रूपायाचा सरबत पी न्हिबरात बसलात न्हीबार लागत असात. म्हातारेन बाबल्यात आशीर्वाद दिलान . पोरा तुझा कधीच वायट होवचा नाय. तुका देवी नेहमीच यश देयत. 
बाबल्याक पुढे जाता जाता बाळकृष्ण कोल्डीक्सचा दुकान दिसताच जांभळाची फाटी विकून झाल्यावर आवशीकडे हट्ट करून तो काॅकटेल आणी फेमस सिकंदर सरबत आठवला .  बाबल्याक हळूच कोरड्या ओठावरून जिभ फिरवलान आणी मनातच म्हटलान आताच भजी खालेय आधी पोरांका बाजार फिरोन आणतयं आणी मग काॅकटेल खावकं घालतयं. आता बाजार पुर्ण भरलो होतो.  सगळीकडे काजीचे सोललेले गर ,फजाव,कुळीथ,करणा,जांभळा ,सोला,सगळो कोकणवेवो घेवन माणसा बसलेली.  रस्त्यावर   कपड्यांचो बाजारव लागलेलो.  निंबार तापाक लागला तसो बाबलो मच्छी मासळी बाजासाकडे घेवन गेलो.  माश्याच्या वासान बाबल्याच्या जीभेक पाणी सुटला.  कसले कसले माशे होते. बांगडो,सुरमय,राणे,सुंगटा,तिसरे,पेडये,मोदका काय नव्हता सगळे माशे होते.  बाबल्यान किमती विचारलान आणी  सुंगटा आणी राणे घेतलान.  पन्नास रूपयाचे तिसरे घेतलान .  तेका वाटाक लागला.  आताच त्याच्या पोटात कावळे ओराडताहत.  माशै घेऊन झाले तसो बाबलो चडवांका म्हणालो आता काॅकटेल खावनं घराक जावया.  निंबार खूप झाला हा. बाळकृष्ण कोल्र्डींक्स मध्ये काॅकटेल आणी सिकंदर सरबत खावन झाल्यावर बाबल्यान .  नारळ , ओली कोथींबीर आणी मासळीचा सामान घेवन. एस.टी. पकडून घराकडे इलो.  चार दीवस गावात रवान.  बाबलो पुन्हा मुंबैक जावक निघालो पण. कुडाळचो बाजार त्येच्या पुरेपुर आठवणीत रवलो.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*