वाचाल तर वाचाल

*'वाचाल तरच वाचाल'*



 तुम्ही जे वाचता त्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. वाचन तुम्हाला तुमचा मेंदू वापरण्यास भाग पाडते, ज्याने की तुमचीप एकाग्रता वाढते. जर तुम्ही तुमची स्मरणशक्ती आणि भाषाक्षमता माणसाला उपजत मिळाली असली तरी जन्मतः भाषा अवगत असू शकत नाही तर भाषा आणि तिचा वापर शिकावा लागतो. तो शिकता येतो. पोहणे, अभिनय करणे, सायकल चालवणे ही जशी कौशल्ये आहेत तसेच भाषेचा सुयोग्य वापर हेही एक कौशल्य आहे. आज जागतिकीकरणाच्या पाश्वभूमीवर आपल्याला वाचन संस्कृतीचा विचार करताना, विशेषतः मराठी भाषेचा विचार करताना मराठी साहित्यिक, अभिनेते, दिग्दर्शक, प्रकाशक, मराठी संगीतकार, साहित्य संस्था, मराठी शिक्षण संस्था व मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यामध्ये काम करणाऱ्या सर्वांची जबाबदारी फक्त मराठी
भाषेचे वैभव वाढविणे एवढीच नाही तर त्याचा प्रचार व प्रसार करणे ही आहे. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने वाचन चळवळ निर्माण करण्याचे एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. वाचनामुळे तुमचे लक्ष केवळ हातात असलेल्या कामावर केंद्रित होत नाही, तर ते तुम्हाला माहितीमध्ये बुडवून एकाग्रता सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मार्ग शोधत असाल तर वाचन तुम्हाला
मदत करेल. प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे, आपल्या पाल्याला वाचनाच्या या चळवळीत सहभागी करून घेणे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानाचे पिढ्यान्पिढय़ा हजारो वर्षे चालत
आलेले हस्तांतरण हे भाषेच्या प्रगल्भ वापराखेरीज संभवत संभवतच नाही. ज्ञानाच्या केवळ हस्तांतरणामुळेच प्रगती संभाव्य आहे, नाहीतर एका पिढीने मिळवलेले ज्ञान तिथेच थिजून, विरून स्थगित झाले असते आणि पुढच्या पिढीला परत पहिल्यापासून सुरुवात करायला लागली असती. आज मागच्यांनी केलेल्या प्रगतीच्या पायावर पुढे जाऊ शकतो. कंदमुळे न खाता स्वतः लागवड करून पिकवून खाणे, गुहेत न राहता घरे बांधून राहणे, चाक, अग्नी, पशुपालन इथपासून वाफ, वीज, यंत्रसामग्री, संगणक यांची निर्मिती आणि मानवाच्या गरजेप्रमाणे त्यांचे उपयोजन या गोष्टी विचारांच्या देवाणघेवाणीखेरीज शक्य
झाल्या असत्या का किंवा विचारांची ही देवाणघेवाण भाषेखेरीज शक्य आहे का? मानवाची बौद्धिक क्षमता महत्त्वाची आहेच, पण तिचे प्रगतीसाठी केले गेलेले उपयोजन हे प्रामुख्याने भाषेच्या माध्यमातूनच शक्य झाले आहे. वाचन क्षमता तुमच्या मुलाला त्याच्या वर्गाचा नायक बनवू शकते. वाचनाची हातोटी असलेले विद्यार्थी शिक्षकांना नेहमीच आवडतात, हे लक्षात असू द्या. वाचन कौशल्य ही नक्कीच भविष्यातील गुंतवणूक आहे, असे समजा हवे तर. तुमच्या मुलासोबत मोठ्याने वाचून वाचनाचा आनंद शेअर करा. हे केवळ त्यांचे वाचन कौशल्यच सुधारत नाही तर बौद्धीक विकास सुद्धा घडविते. मुलांसाठी नियमितपणे मोठ्याने वाचन केल्याने त्यांना भाषेच्या लय आणि ध्वनींचा परिचय होतो, वाचनाची लवकर आवड निर्माण होते. वाचन हे केवळ एक शैक्षणिक साधन नाही तर वैयक्तिक वाढ आणि समजून घेण्याचे प्रवेशद्वार आहे. शैक्षणिक यश, कारकीर्दीतील यश आणि स्वतंत्र जगणे हे वाचन कौशल्याच्या महत्त्वाशी घनिष्ठपणे संबंधित आहे. सशक्त वाचन कौशल्ये मुलांना वर्तमान आणि भविष्यकाळात व्यापक संधी मिळवून देतात, हेही तितकेच खरे आहे. रोज सकाळी मुलांसमोर एखादे वृत्तपत्न ठेवा, त्यांचे लक्ष त्यावर पडेल. आणि साहजिकच वाचनाची आवड निर्माण होईल. वृत्तपत्त्र वाचनातून एक मोठा फायदा म्हणजे, जगातील सामान्यज्ञानाचे आदानप्रदान होते. याचा मुलांच्या भविष्यकाळात शैक्षणिक प्रगतीसाठी नक्कीच फायदा होईल. मुलांचा शैक्षणिक शैक्षणिक आलेख वाढविणे हे पालकांच्या हाती आहे. वाचन हे केवळ एक शैक्षणिक साधन नाही तर वैयक्तिक वाढ आणि समजून घेण्याचे प्रवेशद्वार आहे. शैक्षणिक यश, कारकीर्दीतील यश आणि स्वतंत्न जगणे हे वाचन कौशल्याच्या महत्त्वाशी घनिष्ठपणे संबंधित आहे. सशक्त वाचन कौशल्ये मुलांना वर्तमान आणि भविष्यकाळात व्यापक संधी मिळवून देतात. वाचन कौशल्य याचा अर्थ केवळ शालेय पाठ्यपुस्तक वाचने अपेक्षित नाही. त्या पलीकडे विद्यार्थ्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्याची गरज असते. त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचे हे अभियान निश्चितच प्रेरणादायी आहे. विद्यार्थी वाचत नाही यामागे अनेक कारणे आहेत, त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्या भोवती असलेल्या माणसांच्या हातीच पुस्तके नसतील, तर मुलांच्या हाती पुस्तके कशी येणार? मुलांच्या अवतीभोवती वाचन संस्काराचा विचार दिसायला हवा. मुले सुविचार ऐकून आणि केवळ सांगून फार काही काही शिकत नाही. त्यांना जे शिकवायचे आहे त्यागोष्टी पालक, शिक्षक म्हणून स्वतः ती वाट चालण्याची गरज असते. पालक, शिक्षक जर सतत मोबाइल, दूरदर्शनचा उपयोग करत असतील, तर विद्यार्थी तिकडे आकर्षित होणार यात शंका नाही. वाचता समाज निर्माण करणे महत्त्वाचे आहे आणि आज ते मोठे आव्हान आहे. तसे घडत गेले तर समाज निर्मितीच्या दिशेने पावले पडण्यास सुरुवात होईल. लोकमान्य टिळक तुरूंगात होते आणि त्यांनी गीतेवर भाष्य करणारे गीतारहस्य लिहिले. तो ग्रंथ इंग्रजांच्या हाती देण्यात आला. त्यांनी तो ग्रंथ अत्यंत सुक्ष्मतेने तपासला गेला. याचे कारण टिळकांच्या शब्दसंपत्तीची शक्ती त्यांना ठाऊक होती. मुळात शब्दात शक्ती असते हे इंग्रज जाणून होते. त्यामुळे समाजात काय पेरायचे आहे हे साहित्यिक करू शकतील. साहित्य माणसांची मस्तके घडवत असतात. ती मस्तके पुस्तकांच्या विचारांनी एकदा घडली की, पुन्हा ती माणसे लाचाऱ्यांच्या फौजेत गुंतून पडत नाही. माणसाला स्वाभिमानाच्या दिशेने प्रवास घडवण्यासाठी साहित्य महत्त्वाची भूमिका बजावत असते. साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देणे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे. या उद्दिष्टांच्या दिशेने सहजतेने प्रवास घडणे सहज शक्य आहे. त्यामुळे 'वाचाल' तरच वाचाल !

वाचनामुळे तुमचे लक्ष केवळ हातात असलेल्या कामावर केंद्रित होत नाही, तर ते तुम्हाला माहितीमध्ये बुडवून टाकते, तुम्ही जे वाचता त्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. वाचन तुम्हाला तुमचा मेंदू वापरण्यास भाग पाडते, ज्याने की तुमची एकाग्रता वाढते.


सौ. मनिषा राजन कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*