मोडी लिपीचा इतिहास
मोडी लिपीचा इतिहास
मोडी लिपी केव्हापासून सुरू झाली याबाबत इतिहास तज्ञांच्यात एकमत नाही. काही संशोधकांच्या मते या लिपीचा जन्म दोन हजार बर्षे इतका असावा. भारत मौर्य वंशाचे राजे चंद्रगुप्त, सम्राट अशोक यांच्या काळात मोडी अस्तित्वात आली असे मानते जाते. मौर्याची लिपी म्हणून तिला 'मोडी' म्हटले जाऊ लागले. मोडी लिपीत अपूर्ण वर्ण काढण्याची सोय नाही. त्यामुळे संयुक्त वर्ण बालबोधीप्रमाणे मोठ्या लिपीत बिनचूक लिहिता येत नाहीत. उदा. व्य'चे लेखन 'वय ' असे आढळते. त्याकाळात अशोक लिपी होती. त्यातही ऱ्हस्व दीर्घ व्यवस्था नसल्यामुळे अशेक लिपीची सुधारित आवृत्ती म्हणजे मोडी लिपी असे मानले गेले. दुसरे मत असे की, सुमारे सातशे वर्षे दक्षिण भारतात यादवांचे साम्राज्य होते. महादेवराव यादवांच्या कारकिर्दीत हेमांडपंत किंवा हेमाद्रीपंत नामक प्रख्यात प्रधानमंत्री होऊन गेला (इ.स. १२६०) हेमांडपंताचे मराठी भाषेवर अलोट प्रेम होते. त्यांनी मराठीत बरीचशी ग्रंथरचना केली असावी, असा तर्क तज्ञांचा आहे. परंतु त्यांचे ग्रंथ उपलब्ध नाहीत. खाजगी व राजकीय व्यवहारात लिहावयाच्या पत्राचे मायने कसे असावेत याबद्दल त्यांनी काही नियम तयार केले होते. यादव राजा सिंघण यांच्या वेळेपासून दरबाराचे काम संस्कृत भाषेत चालत होते, परंतु हेमाद्री यांनी ही प्राचीन वहिवाट बदलून कागदपत्र, सनदा, दानपत्रे, निवडपत्रे बक्षसिपत्रे, हुकूमनामे बगैरे मराठीत लिहिण्याचा नवीन उपक्रम सुरु केला. अर्थात
देवनागरी हीच दरबारातील लिपी होती. परंतु त्या लिपीत सुबोध व सुवाच्च रीतीने लिहावयाचे म्हटल्यास पुष्कळ वेळ खर्ची होतो. हे टाळण्यासाठी व अल्प वेळात बराच मजकूर लिहिता यावा म्हणून हेमाद्रीं यांनी 'लघुलेखन पद्धती (शॉर्टन्हन्ड) तयार केली. हिला मोडी लिपी अशी संज्ञा असून, तिचे जनकत्व हेमाद्री यांच्याकडेच जाते
ब्राम्ही लिपी भारतात फार वर्षापासून वर्षापूर्वीच आहे. तिच्यापासून गुप्तलिपी बनली या कुटित लिपीला कायस्थ रोली, सदर लिपी गुप्त राजांच्या कारकिर्दीत उत्तर भारतात बहुतेक भागात प्रचलित होती. या ब्राम्ही लिपीपासून कुटिल लिपी निर्माग झाली तिच्या नावावरून तिच्या वैशिष्ट्याचा बोध होतो. वर्णमालेतील मूळाक्षांतील वळणार वक्रता दिसून येते. म्हणूनच या लिपीला कुटिल लिपी उर्फ मुरडलेली लिपी अर्थातच मोडी लिपी असे तसेच या लिपीचा कायस्थ लिपी अथवा केधी लिपी, असेही म्हटले जाई. संस्कृत व मोडी मराठी हे दोन शब्द एकाच अर्थाचे आहेत. मोडी लिपीला पिशाच्च लिपी असेही म्हटले जात असे. एकंदरीत सुवाच्च मोडी, असे मानण्यास हरकत नाही
काही लिपीतज्ञांच्या मते हेमांडपंत यांनी
ही लिपी लंकेतून आणली असे म्हटले जाते. मराठ्यांचे राज्य दक्षिणेत कन्याकुमारी पर्यंत पसरले होते, त्यामुळे जवळचा प्रदेश मागून ते लंकेत गेले होते. तेथील सिंहला व मोडी लिपीत काही साम्य दिसून आलेले नाही. 'मौर्य' या शब्दाचा 'मोडी हा अपभ़ंश लिपीतज्ज्ञ अमान्य करतात, देवनागरीत जो कानावरून खाली काढतात, तो शेवटी लेखनाचा वेग वाढविण्यासाठी खालून वर नेण्याच्या प्रयत्नाने मोडी वळण निर्माण केले. व ही घटना हेमांडपंताच्या कारकिर्दीत घडणे शक्य आहे. मोडी लिपीतील सर्वात जुना उपलब्ध असलेला कागद इ.स. १३८९ मधील आहे. वरील सर्व गोष्टीचा विचार करता सुमारे सातशे वर्षापूर्वी दक्षिणपथ (महाराष्ट्राचे जुने नाव ) कर्नाटक, आंध़ प्रेदश या विस्तृत भूभागावर यादवांचे साम्राज्य होते. त्यातील महादेवराव यादव यांच्या कारकिर्दीत हेमांडपंत नावाचा प्रधानमंत्री होऊन गेला. त्याने अनेक सुधारणा राज्यात घडवून आणल्या सर्वदूर पसरलेल्या अशा साम्राज्यातील व्यवहार झपाटल्याने व्हावा यासाठी देवनागरी लिपीत सुधारणा करून त्याने मोडी लिपी तयार केली असावी असे मानण्यास हरकत नाही. यादवांच्या काळात सरकार दरबारी मोडी लिपीला स्थान मिळाल्यामुळे समाजिक तिचा प्रसार राज्याच्या कानाकोपऱ्यात झापाटपाने होऊ शकला.
काळानुसार मोडी लिपीचे यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन, ब्रिटीशकालीन असे चार ढोबळ विभाग पाडता येतील.
यादवकाळ :- या काळात लेखनासाठी सामान्यतः बोरूचा वापर करीत. बोरू सात आठ इंच लांब बांबूच्या तुकड्याच्या टोकाला तिरपा छेद देऊन तिची लेखणी तयार करीत. त्यामुळे हस्ताक्षर जाडे, आकाराने मोठे, स्पष्ट व त्याचे वाचन सुलभ असे, मात्र बोरूने लेखन करताना एक अक्षर काढतानाही तो वारंवार शाईच्या दौतीत बुडवावा लागत असे. महादेवराव यादव यांच्याकाळात मराठी भाषेला व मोडी लिपीला जनमानसात इतकी मान्यता मिळाली की, पुढे अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा येथील मुस्लिम रियासतीतही तेथील राज्यकर्ते उर्दू बरोबर मोडी लिपीचा वापर राज्यकारभारात करीत असत.
शिवकाल :- या काळात बोरूचा वापर कमी होऊन त्या जागी टाकाने लिहिणे सुरू झाले. टाकाने लिहिलेला मजकूर लपेटीदार व आकाराने लहान गुंतागुंतीचा असे. त्यात अनेक शब्द संक्षेप वापरले जाऊ लागलेत. त्यामुळे वाचनात क्लिष्टता आली. शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी अवाजी यांनी यात बऱ्याच सुधारणा करून लेखनाचा वेग वाढविला मात्र त्यात पारसी, अरबी, उर्दू भाषांतील शब्द येऊ लागल्याने वाचनास थोडे कठिण होऊ लागले.
पेशवेकाळ : पेशवाईतील टाकाने लिहिलेली अक्षरे वळणाऱ्या दृष्टीने चिटणीसी, महादेवपंती, बिवलकरी, रानडी वळण असे प्रकार आढळून येतात. पेशवाईच्या शेवटच्या कालखंडात इंग्रजांचा पसारा हळूहळू वाढल्याने इंग्रजी शब्दांचा भरणा मोडीत असल्याने अपभ्रष्ट रूपांचा मजकूर वाचनास अतिशय कठिण जाऊ लागला. ब्रिटीशकालीन मोडी इंग्रजी अमलात काहीकाळ मोडी व इंग्रजी असे जोडून लिखाण होत असे. लेखनासाठी शाईने भरलेले फाऊंटनपेन याचा वापर होऊ लागला. इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे मोडीत अनेक शब्द येऊ लागले. त्यामुळे वाचन दुर्बोध होत गेले राज्यकारभारात मोडीचा वापर कमी होऊन इंग्रजीचा वापर भेटीच्यावेळी अधिक होऊ लागला. उच्चभ्रू व सुशिक्षित जन आपले लिखाण मोडी ऐवजी इंग्रजीत करणे प्रतिष्ठेचे मानू लागले.
महाराष्ट्र राज्यात. सरकारने १९५० पासून देवनागरी लिपीत सर्व लिखित व्यवहारांना मान्यता दिल्याने , हळूहळू मोडी लिपीचा अस्त झाला.
सौ. मनिषा राजन कडव
अभ्यासू विवेचन
ReplyDelete