Posts

Showing posts from September, 2021

मध्यरात्री नंतरचे तास.

Image
फोटो स्त्रोत गुगल - मध्यरात्री नंतरचे तास. लेखिका : सलमा अनुवाद : सोनाली नवांगुळ या कादंबरीतील राबिया, रहीमा, जोहरा, अमीना, खदीजा, फिरदौस, फरीदा, नुराम्मा आणि अशा आणखी कितीतरी स्त्रिया त्यांच्या खासगी पुरुषसत्ताक जगात छोटी–छोटी विद्रोहाची निशाणी फडकवतात, नाना तडजोडी करतात... मैतत्री जुळते, भंगते, घरं एकत्र येतात दुभंगतात... पण या सगळ्यांच्या नकळत धिमेपणानं बदल घडत राहतात... बायकांची आयुष्य बदलून जातात. सलमाची काव्यात्म, सरळसाधी भाषा मुस्लिम स्त्रियांच्या कौटुंबिक जगण्यातली व्यस्तता, जटिलता आणि धुसमट परिणामकपणे मांडते. तमिळनाडूमधील बायकांनी तोंड उघडणंच मान्य नसणार्‍या रूढीप्रिय आणि बंदिस्त समाजात १९६८ मध्ये सलमाचा जन्म झाला. तिचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा हा परंपरावादी समाज हादरला सलमा व आणखी तीन कवयित्रींवर अश्लील व बीभत्स लेखनाचा आरोप झाला, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. तामिळनाडूतील तिरूचिरापल्ली या जिल्हयाच्या तिरूवनकुरिची ग्राममपंचायतची सरपंच म्हणून सलमाने काम केलं. राज्याच्या समाज कल्याण मंडळाची अध्यक्ष म्हणून काम करण्‍याचीही संधी तिला मिळाली आहे. राजकारणात...

पडघवली - गो. नी. दाण्डेकर

Image
फोटो स्त्रोत गुगल - पडघवली - गो. नी. दाण्डेकर प्रत्येक गावखेड्याला एक इतिहास असतो. काही अख्यायिका असतात. गावचं रक्षण करणारे राखणदार असतात. ग्रामदेवता असतेच पण इतरही देव असतात, मग तो एखादा जुनाट वृक्ष असेल, जलाशय असेल, किंवा नुसतं वळण असेल. गाव म्हटलं की जसं गावात राहणाऱ्या माणसांची मन राखणं आलं, तसंच या जागांबद्दल आदरभाव वा भितीभाव बाळगणं आलंच. बऱ्याचदा आपल्याला त्या जागांमागची कथाही धड माहीत नसते पण पिढ्यानपिढ्या लोक श्रद्धेनं नमस्कार करत आले म्हणून आपणही या श्रद्धेचा मान राखतो. अशी कथा सांगणारं कोणी म्हातारं माणूस भेटलं तर आपण जीवाचे कान करून ऐकतो. विश्वास अविश्वास या पलीकडे त्यांना या जागांबाबत असणारा पूज्यभाव, पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान, त्याचरोबर त्यांच्या चूकांची प्रांजळ कबूली सारं आपल्याला त्या डोळ्यात दिसतं. हेच तर गावाचं सार, हे सारं काढलं तर उरतं काय? पडघवली ही अशाच एका दाभोळ जवळच्या कोकणी खेड्याची कथा. सुरुवात होते ते अंबावहिनीच्या लग्नानंतरच्या गृहप्रवेशाच्या आठवणीपासून. ही खोतांची मोठी सून. लहान वय असल्यामुळे कधी माहेर कधी सासर असा तिचा खुशालचेंडू कारभार. म...

संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारे बालनाट्य– निर्धार ठाम शेवटला नेऊ आपले काम

Image
संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारे बालनाट्य– निर्धार ठाम शेवटला नेऊ आपले काम मुलांच्या मनात संस्कार, संस्कृती आणि पर्यावरणाची जनजागृती करणाऱ्या ‘निर्धार ठाम शेवटला नेऊ आपले काम ‘ या सुंदर नाटिकेचे लेखन बबन शिंदे यांनी केलेले आहे. बबन शिंदे हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील प्रसिद्ध कवी असून त्यांचे काटेरी वाटा, पोटमारा हे कविता संग्रह, प्रांजळ मन, एकोपा, बडबडी बबली, आमच्या गावात आमची शाळा हे बालकविता संग्रह. संतचरित्र, बुरुजावरचे भूत, सत्कार्याचा आनंद, छोट्यांच्या आटापिटा हे कुमार कथासंग्रह. गोष्ट आधुनिक संताची दीर्घ कथा संग्रह. मराठवाड्याचे बालसाहित्य आकलन आणि समीक्षा, धन्या, माणिक झाला राष्ट्रसंत हे किशोर कादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचा वा. गो. मायदेव बालवाङ्मय पुरस्कारासह इतर महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. बालभारती चौथीच्या अभ्यासक्रमात त्याच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. एकविसावे शतक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे असले तरी आपण आपल्या स्वार्थासाठी जुन्या रुढी परंपरेला, संस्कार आणि संस्कृतीला फाटा देत पर्यावरणऱ्हासा...

वालॉंग ...एका युद्धकैद्याची बखरलेखक : श्याम चव्हाण

Image
फोटो स्त्रोत गुगल - वालॉंग ...एका युद्धकैद्याची बखर लेखक : श्याम चव्हाण                                                                  १९६२, याच वर्षी हिमालयातील हिमशुभ्र शांतता भंग पावली. शांतिमंत्रांचा नाद घुमणार्‍या हिमालयात तोफांचा गडगडात घुमू लागला. शांततेचं प्रतिकच असलेल्या हिमालयावर रक्ताचे पात वाहू लागले... चीन्यांनी आक्रमण केलं... पराक्रमाची शर्थ करूनही भारतीय जवानांच्या वाट्याला आला पराजय... माघार... कैद... 'वालॉंग ... एका युद्धकैद्याची बखर'मध्ये भारत-चीन युद्धात लढलेले लेफ्ट्नंट-कर्नल श्याम चव्हाण कथन करत आहेत एक शौर्यगाथा... आधी तुंबळ रणसंग्राम आणि नंतर कैद... एक चित्तथरारक अनुभव कथन.लेफ्टनंट कर्नल श्यामकांत चव्हाण हे एकोणीसशे बासष्टमध्ये झालेल्या चीनविरुद्धच्या युद्धात तेव्हाच्या नेफा म्हणजे आताच्या अरुणाचल प्रदेशात भारतमातेची लाज राखण्यासाठी, आणि हिमालयाच्या शिखरांचं संरक्षण करण्यासाठी लढायला गेले...