डिजिटल व व्हर्च्युअल ग्रंथालयांमधील फायदे व तोटे*
*डिजिटल व व्हर्च्युअल ग्रंथालयांमधील फायदे व तोटे* ई-बुकचा शोध लावणारे ६४ वर्षीय मायकल हार्ट यांनी पुस्तके जनतेपर्यत मोफत पोहोचवण्याचे स्वप्न पाहिले होते . त्यानंतर ४ जुलै १९७१ रोजी हार्ट यांनी ई-बुकचा शोध लावला आज हार्ट या जगात नाहीत . पण लाखो लोक ई-बुकचा वापर करीत आहेत . यातूनच डिजिटल व व्हर्चुअल ग्रंथालयांची सुरुवात अनेक ठिकाणी झाली तर जाणून घेऊया त्यांचे फायदे आणि तोटे. डिजिटल ग्रंथालय (Digital Library) : डिजिटल ग्रंथालय म्हणजे सुसंघटित इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रलेख संग्रह होय. हा संग्रह इंटरनेट, ऑनलाईन अथवा ऑफलाईन स्वरूपात (इ-पब्लिकेशन्स , इ-बुक्स, इ-नियतकालिके इत्यादी) साठवून ठेवलेला माहिती संग्रह होय. डिजिटल ग्रंथालय हे डिजिटल माहिती साधनांशी निगडित असून या ग्रंथालयात माहिती संग्रहण, माहिती शोध व माहितीचे संप्रेषण यासाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. थोडक्यात, डिजिटल ग्रंथालये म्हणजे डिजिटल माहितीची साठवण व प्रतिप्राप्तीचे विस्तारीकरण होय. डिजिटल माध्यमातील डेटा (टेक्स्ट, प्रतिमा, ध्वनी, चलचित्रे, ॲनिमेशन इत्यादी) जो नेटवर्क प्रण...