Posts

Showing posts from August, 2023

श्यामची आई~ साने गुरुजी

Image
श्यामची आई~ साने गुरुजी   श्यामची आई मध्ये वेगवेगळ्या भागांना 'रात्र' असे म्हटलेले आहे. साने गुरुजी रात्रीच्या वेळी या कथा आपल्या सहचारींना सांगत. त्यामुळे पहिल्या रात्री सांगितलेली कथा म्हणजे पहिली रात्र असे या कथनाचे विभाजन केलेले आहे. गुरुजींना आठवेल तसे त्यांची आई स्वर्गवासी होईपर्यंतचे बालपण हा त्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. दररोज तीन रात्री वाचून काढणे हे टार्गेट ठरलेले होते. क्वचितच एखादी रात्र विस्तृत लिहिलेली आहे. पंधरा-वीस दिवसांत ते पुस्तक वाचून पूर्ण झाले. शेवटाकडे जाताना खूप भरून आले. तो शेवट मी पहिल्यांदा वाचला त्यानंतर परत कधीच वाचला नाही. नकळतपणे मी माझी तुलना श्यामशी आणि आईची तुलना त्याच्या आईशी करू लागले. का कुणास ठाऊक पण ते पुस्तक वाचताना मी त्या जगात दूरवरून या गोष्टी पाहतेय असे वाटायचे. आई कधी रागावली की मला मी या घरात का जन्माला आले, श्यामच्या घरी असायला हवे होते असेही वाटायचे. त्या वयात सगळ्यांचे एक फँटसी जग असते. माझ्यासाठी ते श्यामचे घर होते.  त्या पुस्तकातील बेचाळिसावी रात्र आहे लाडघरचे तामस्तीर्थ. ते माझे सगळ्यांत आवडते प्रकरण आहे. श्री. ...

बावनकशी सोनं - बहिणाबाईंची गाणी.

Image
बावनकशी सोनं - बहिणाबाईंची गाणी.  बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी खानदेशातील असोदे या गावामध्ये झाला. असोदे हे गाव जळगाव पासून ५-६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. त्यांच्या वडिलांचे नाव उखाजी महाजन होते.आणि आईचे नाव भिमाई होते.  बहिणाबाईंना एकूण सहा भावंडे होती. त्यात तीन बहिणी-तुळसा , अहिल्या आणि सीता. आणि तीन भाऊ – घना, घमा आणि गणा.  १८८० काळ म्हणजेच भारतातील ब्रिटिश राजवटीचा कालखंड होय. या काळात भारतीय सुधारकांची दुहेरी लढाई नुकतीच सुरु झालेली. एकीकडे सामाजिक सुधारणेसाठी समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध लढा सुरु होता. तर दुसरीकडे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी टकराव उडत होते.  अश्या या संघर्षाच्या काळात बहिणाबाईंचा जन्म झळ. तोही एका शेतकरी कुटुंबामध्ये. तत्कालीन रीतीप्रमाणे बहिणाबाईंचे वडील उखाजी महाजन त्यांनी आपल्या मुलीचा -बहिणाबाईंचा विवाह जळगावच्या नथुजी चौधरी यांच्याशी करून दिला. विवाहाच्या वेळी बहिणाबाईंचे वय फक्त १३ वर्षे होते.  बहिणाबाईंचा संसार हा आधी एकत्र कुटुंब पद्धतीतीलच होता. मात्र काही घरगुती कलहामुळे त्यांचे कुटुंब वि...

तोत्तोचान - सर्जनशील खिडकी.

Image
तोत्तोचान - सर्जनशील खिडकी. या शाळेच आयुष्य अवघ आठ वर्ष मात्र आज ऐंशी वर्षांनंतरही या शाळेच आकर्षण कायम आहे. हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला ही शाळा हवीहवीशी वाटते, आपल्याला का मिळाली नाही अशी शाळा अशी खंत वाटणे हेच कोबायाशींच्या शिक्षणपद्धतीचे यश आहे. ते स्वतः या शाळेचे मुख्याध्यापक असल्याने या शाळेत राबविलेला प्रत्येक उपक्रम विद्यार्थ्यांच बाल मानसशास्र आणि वय विचार करूच केलेला आहे. सगळी मुलं स्वभावतः चांगलीच असतात यावर त्यांचा विश्वास आहे. मुलांमध्ये “चांगुलपणा” ची रुजुवात करणे आणि तो वाढताना त्यांची वैयक्तिकता टिकून राहणे हा मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शाळेची निर्मिती केली. या पुस्तकाच्या लेखिका तेत्सुको कुरोयानागी ह्या याच शाळेत शिकल्या. जे घडलय ते त्यांनी लिहिलं आहे. यात कोणताही कृत्रिमपणा जाणवत नाही. पुस्तक प्रकाशानंतर पहिल्या वर्षात पस्तीस लाख प्रती खपल्या. पुढच्या तीन वर्षात तो आकडा साठ लाखावर जावून जपान मधील बेस्ट सेलर पुस्तक होण यातच या पुस्तकच महत्व अधोरेखित होत. जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं आणि जगाच्या काना-कोपऱ्यात हे पुस्तक पोहचलेल हे पुस्तक म...

झाड आणि माणूस

Image
झाड आणि माणूस डोळ्यांला भूक लागणे काय असते, हे अनुभवण्यासाठी काही वेगळ्या वळणाची पुस्तकं वाचण्याची सवय लावून घ्यायची असते. त्यातून त्या पुस्तकाचं आगळेपण लक्षात येतं. ज्येष्ठ पत्रकार आणि समाजविश्लेषक निळू दामले यांच्या 'झाड आणि माणूस' या पुस्तकाकडे याच नजरेतून बघायला हवं. त्याच्या आस्वादातून जे एक निर्णायक आणि गोळीबंद मत हाताशी येतं, ते म्हणजे 'निसर्गाला मैत्र भावनेतून जवळ कसं आणता येतं' ते या पुस्तकात कळतं. रोजच्या जीवनातील फुलं-फळं, अन्न इत्यादी घटकांच्या विषयी एक वेगळी माहिती या पुस्तकातून कळते. आपल्या झाडाच्या मैत्रभावनेचं निळू दामले यांना कळलेलं महत्त्व सर्वदूर पसरलेल्या माणसाला सहज समजेल असं उतरलेलं आहे. झाडांच्या जन्मकथा, प्रत्येकाच्या मनात झाड कशा पद्धतीनं उगवत असतं आणि वाढतं त्यावर प्रत्येकाच्या मनाचं बैसणं असतं. झाड आणि माणूस ऋणानुबंधाची एक साखळी सूत्रबद्धतेने डोळ्यांसमोर येत जाते. त्यातून निर्माण होते ती सख्यभक्ती. झाड बघणं तसं नवं नसतं. त्यात प्रत्येक व्यक्तीचा भावार्थ वेगळा असतो आणि तेच वेगळेपण निळू दामले यांच्या डोळ्यांला लाभलेले दिसते. नैमित्तिक केलेल्या ल...

व्हिटॅमिन्सच्या शोधांची रंजक सफर

Image
व्हिटॅमिन्सच्या शोधांची रंजक सफर व्हिटॅमिन अर्थात जीवन्सत्त्वे शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असतात…सूर्यप्रकाशातून ड जीवनसत्त्व मिळते, लिंबूवर्गीय फळांतून क जीवनसत्त्व मिळते…जीवनसत्त्वांच्या अभवातून बेरीबेरी, रातांधळेपणा, मुडदूस इ. विकार होतात…हे अगदी सामान्य ज्ञान आहे, जे बहुतेक आपण सगळे शाळा कॉलेजमध्येच शिकलो असू. पण खरंच माणसाला ही अशी जीवनसत्त्व आहेत हे कसं कळलं? त्यांना ही नावं कशी पडली? अमुक एका पदार्थात अमुक जीवनसत्त्व मिळतं हे कोणी आणि कसं शोधलं? हे शोधणं इतकं सोपं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या अभ्यासक्रमात नव्हती. त्यामुळे माझ्यासारखे जे वैद्यकीय क्षेत्रात नाहीत त्यांना हे सगळं माहीत नसेल. पण अच्युत गोडबोले- वैदेही लिमये जोडीने आपल्यासाठी माहितीचा सागर ढवळून त्याचं सार साडेचारशे पानी पुस्तकात आपल्यासमोर मांडलं आहे. जीवन्सत्त्वांच्या शोधांची अद्भुतरम्य कहाणी आपल्या समोर उलगडली आहे. दोन शतकांपूर्वी लुई पाश्चर या शास्त्रज्ञाच्या जमान्यात रोगांचं कारण वेगवेगळे जिवाणू(बॅक्टेरिया) असतात हे पाश्चात्त्य जगाला कळलं होतं. त्यामुळे स्कर्व्ही , पेलाग्...