माणूस म्हणून

माणूस म्हणून

माणूस म्हणून आज 
माणुसकीला जाग आली
माणसातीलच माणसे माणसांच्या 
मदतीला धावून आली।।१।।

जेव्हा जेव्हा संकट आले माणसावर
या माणसातलाच माणूस धावून आला वेळेवर
आणी या माणसानेच मदत केली 
आणी मात केली संकटावर।।2।।

२६जुलै,२६ नोव्हेंबर अशी
कित्येक संकटे आली
यावेळेसच माणसातली खरी
माणूसकी दिसुन आली।।३।।

रेल्वे टॅकमधून चालणार्‍या माणसांना 
जीननावश्यक वस्तूचा पुरवठा केला होता
कोणीतरी रस्त्यावर या माणसांसाठी
पिण्याचे पाणीही घेऊन उभा होता।।४।।

यावेळीही ही मानवता ही
अस्तित्वात एकच होती जात
एकमेकांच्या मदतीसाठी असंख्य
सरसावले होते हात!!५।।

२६/११ हल्ल्यावेळी जेव्हा 
द्र्युष्ट लोकांचा झाला प्रहार
पोलीसातील माणसांनीच
दिला सामान्य जणांना आधार।।६।।

आजही लढत आहे जेव्हा मुंबई कोरोनाशी
वैद्यकीय कर्मचारी पेशंटची सेवा करताहेत
इतरांना बाधा होऊ नये म्हणून
पोलीस रस्यांवर रात्रभर ड्युटी करताहेत।।७।।
नेहमीच असतो माणसातला माणूस जागा
वेळ पडेल तेव्हा मदतीला हा सदा उभा
सौ.मनिषा राजन कडव
कल्याण








Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*