*नात*
नातं
नात तुझ माझं
जसं नभ आणी भूमी
सुर्य मावळताना
क्षितिजावर एकरूप होणारी
नातंं तुझ माझ
युगायुगांतरीच
कधीच न भंग पावणार
नेहमीच अभेद्य असणार
नातं तुझ माझं
नेहमीच पहिल्या
पावसाच्या सरीची वाट
पाहणार्या चातकापरी
नातं तुझं माझं
सुगंध पसरवणारं
धुंद बेधुंद करणार
त्या रातराणीपरी
नातं तुझं माझं
क्वचितच गवसणारं
पण शाश्वत असणार
शिंपल्यातल्या मोत्यापरी
नात तुझं माझ
सार्या नात्यां पलिकडचं
इतरांना ते नाही समजायचं
ह्रदयात ते गुंतायचं
नाते तुझं माझ
त्यागातील सुख
नाहि पाहील जरी मुखं
पण सदा जवळी तुझ्याचं
नातं तुझ माझं
प्रेम धागा गुंतलेला
विश्वासाने घट्ट
झाली विण याची
नातं तुझ माझं
चाकोरी बाहेरीलं
अपेक्षां पलिकडील
यात आहे फक्त विश्वास तुझा माझा
सौ. मनिषा कडव
r
💐💐💐
ReplyDelete