*लोकल आणि महिला डब्ब्ा

*लोकल आणि लेडीज डब्बा*
  अस पाहील तर लेडीज डब्ब्या मध्ये रोज नुसती चावचाव चालू असते.  रोज अगदी रामप्रहरी एक तरी भांडण ऐकायला मिळत.  कधी सीटवर बसण्यावरून नाहीतर चढताना धक्का लागला म्हणून किंवा मधल्या पॅसेज मधे उभे राहण्यावरून .  काहीनाकाही कारण असायचेच.  पण सध्या कोरोनामुळे मास्क वापरायची सक्ती असल्याकारणाने हे लेडीज डब्बे शांत झालेत. ना खुसपुस ना वाद ना गर्दी ना गोंधळ.  सुरक्षित अंतर ठेवून हे डब्बे शांत आहेत. जर वादाचीच वेळ आली तर फक्त डोळे मोठे होताहेत.   आणि त्यात मास्क लावूनही कोणी शिंकलच तर चार कोस लांब उभ राहील जातय. खरचं या कोरोनाने माणसाला शहाणपण मात्र शिकवल.
सौ.मनिषा राजन कडव
कल्याण

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*