बखर बिम्मची (
पुस्तक परिचय - बखर बिम्मची (बालकथा )
लेखक - जी. ए. कुलकर्णी
हमखास वाचलेच पाहिजे असे काही सदरात माझ्या पसंदीच्या यादीत जी.ए. कुलकर्णी हे नाव आलं ते या पुस्तकामुळे. फ़ार लहानपणापासून हे पुस्तक वाचनात आलं आहे.
बखर बिम्मची कथा आहे बिम्म
बखर बिम्मची : बिम्म हा ३-४ वर्षांचा मुलगा आहे. अजुन शाळेत जायला सुरूवात झाली नाही. बब्बी (मोठी बहीण) शाळेत जाते म्हणून ती बिम्मसमोर थोडा शिष्टपणा दाखवते. बिम्मचे बाबा बाहेरगावी नोकरीला आहेत. त्यामुळे बब्बीसोबत खेळणं (किंवा भांडणं), तिच्यासोबत बरोबरी करणं आणि आईला आपल्या खोड्यांनी वैतागून सोडणं हा बिम्मचा प्रमुख दिनक्रम. यातील बहुतेक खोड्या या खोड्या नसून बिम्मच्या बालबुद्धीला पडणारे निरागस प्रश्न आहेत आणि आईलाही ते जाणवतं. त्या (बहुतांशी) निरागस खोड्या आपल्याला बिम्मच्या जास्तच जवळ आणतात. बिम्म मधील प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या लहानपणीच्या मनात असलेल्या fantasy ची आठवण करुन देते. हळूहळू आपण पण बिम्मच्या विश्वात प्रवेश करतो. जीए आपल्या असाधारण कथांसाठी प्रसिद्ध आहेत. एवढ्या complex कथा लिहीणारे जीए बिम्म सारखं हळूवार लिहू शकतात हा जी.ए वाचलेल्या वाचकांना आश्चर्याचा धक्काच आहे.
जर मी बिम्म कोणाला वाचायला दिलं आणि त्यानं भारावून जाउन बखर बिम्मची बद्दल बोलला नाही तर मला जाणवतं की त्या व्यक्तीची व माझी wavelength थोडीशी वेगळी आहे. त्यातल्या त्यात ज्यांचं बालपण निमशहरी भागात गेलेलं आहे अशांना तर बखर बिम्मची अगदी nostalgic बनवतं. लहानपणी आपल्याला काही प्रश्न पडतात, व त्याची उत्तरं शोधण्यासाठी आपण काही fantasies चा विचार करतो. मोठं झाल्यावर अर्थातच त्या प्रश्नांची उत्तरं सापडतात पण त्यातील सौंदर्य हरवतं. जी. ए. बिम्मच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा हरवलेल्या fantasies मिळवून देतात
नावाच्या एका ४-५ वर्षाच्या मुलाची. बिम्मचं विश्व त्याची आई, बहीण बब्बी, शहरात नोकरीनिमित्त असणारे बाबा यांच्याभोवती फ़िरतं. वय लहान असल्यामुळे बिम्म अजून शाळेत जात नाही. दिवसभर उनाडक्या करीत फ़िरणे, बब्बीला छळणे, हा त्याचा दिनक्रम. एका लहान मुलाचं विश्व जी.एं.नी फ़ार सुंदर रेखाटलं आहे.
प्रथमदर्शनी पाहता हे लिखाण बालकथा प्रकारात मोडणारं वाटतं. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते वाचताना त्यातून त्या त्या वयाच्या प्रगल्भतेनुसार अर्थ लागतो. लहान वयात वाचताना बिम्मचा खोडकरपणा, बब्बीला त्रास देण्यात त्याला वाटणारी मजा, बाबांच्या कपाटातल्या विविध वस्तू शोधण्यात त्याला मिळणारा आनंद या गोष्टी दिसतात. मात्र थोड्या प्रगल्भ वयात वाचल्यानंतर त्याच कथानकातली जी.ए. छाप गूढ लेखणी समजते.
या बिम्मचे स्वत:चे असे खास शब्द जी.एं.नी फ़ार उत्तमपणे मांडलेले आहेत. बाबांच्या कपाटात सापडलेल्या जुन्या पिंज-यातल्या "निनम" नावाच्या पक्ष्याची "सलनिवुलम कसयवुलम" अशी काहीशी असलेली बिम्मला येणारी भाषा, शेजारच्या वाड्यातला "जिंदाक" नावाचा पंख असलेला घोडा, आणि इतर लहान लहान कथांमधून जी.एं. नी फ़ार सुरेख मांडणी केलेली आहे.
एका कथेमध्ये बब्बीच्या मैत्रिणी बिम्मला छळतात म्हणून बिम्म आकाशातून जाणा-या ढगाला काठी टोचून त्यांच्यावर पाऊस पाडतो, आणि घरी येऊन कौतुकाने आईला आपल्या पराक्रमाची वर्दी देतो. पण त्याच वेळी या मुलींमध्ये फ़ारशी न मिसळणारी पमी पठाण एकटीच भिंतीला टेकून बसली होती, आणि "ती व्यवस्थित आपल्या घरी गेली असेल का गं?" असा प्रश्न आईला विचारतो तेव्हा क्षणभर मनात चर्रर्रर्र झाल्याशिवाय राहत नाही. अशा अनेक कथांमधून खास जी.ए. शैली वाचायला मिळते.
पुस्तकप्रेमी मंडळींच्या संग्रही असलेच पाहिजे या सदरात मोडेल असं हे पुस्तक परचुरे प्रकाशन मंदिर ने प्रकाशित केल आहे.
सोबत पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे छायाचित्र.
सौ.मनिषा राजन कडव
मुख्य ग्रंथपाल ,डी.एस.हायस्कूल ,शीव,मुंबई-२२
This comment has been removed by the author.
ReplyDeleteछान लिहिले 💐💐
ReplyDelete