स्त्री हक्क चळवळीचा उगमद बुक आॅफ द सिटी आॅफ लेडिज
स्त्री हक्क चळवळीचा उगम -
द बुक आँफ द सिटी आँफ लेडिज .
अलीकडेच द बुक आँफ द सिटी आँफ लेडिज ही पेग्विन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली इंग्रजी कादंबरी माझ्या वाचनात आली . स्त्रीमुक्ती ,स्त्रीहक्क इ.संबधीची चळवळ विसाव्या शतकात उगम पावली हा सार्वत्रिक समज आहे . माझा ही तोच होता पण ही कादंबरी वाचल्यावर तो दूर झाला. स्त्रीहक्क चळवळीचा उगम आहे १४०५ मधला आणि तो एका पुस्तकातला .ते पुस्तक म्हणजे The book of the city of ladies चळवळ उभारा हे सांगणार .हे पुस्तक नसून ती एक कादंबरी. पाश्चिमात्त्य लेखिका खिस्टिन-डी-मिझान (१३६४-१४३०) ती व्हेनिस येथे राहत होती. आयुष्यभरात तिने ४० हून अधिक पुस्तके लिहिली होती. तिच्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच तिला वैधव्य प्राप्त होते पदरात तीन मुले. लिखाणातून मिळणाऱ्या पैशातून तिने संसार चालवला होता .लिखाण हीच तिची गरज होती.
स्त्रियांचे शहर हे तिने वर्णिलेले काल्पनिक शहर त्यात रुपकात्मकरित्या तीन माता रंगवलेल्या आहेत. त्यांना justify (न्याय ) , Rectitude ( ऋजुता) आणि Reason (तर्कशक्ती) ही नावे दिलेली आहेत. त्या तिघी या शहराचा कारभार चालवत असतात. त्यांना सन्मान मिळतो वाखाणणी होत असे . लेखिकेने त्यांच्याशी जो संवाद दाखवला आहे ज्यातून तिच्या हताशेच्या अवस्थेतून तिला उत्थान मिळाले होते . त्या काळी पुरुषी अहंकारामुळे स्त्रियांची अवस्था हीनदीन होत होती . ही कादंबरी म्हणजे तत्कालीन लोकप्रिय लेखक जीन डी प्यून (१२२०-१३०५) याला प्रत्युत्तर होता ते त्याच्या लिखाणातून स्त्री म्हणजे दुष्ट अनैतिकपणाचा नमुना रंगवलेला. पिझानची कादंबरी बचावात्मक नसून त्याहून वेगळी उच्च दर्जाची आहे घरगूहस्तीमध्ये पुरुषांकडून निर्माण केल्या जाणाऱ्या अडचणी सोडवतानाची स्त्रीची कर्तबगारी तिची रास्त भूमिका यांचा गौरव केलेला आहे. त्यातून कौटुंबिक व सामाजिक पेचप्रसंगातून मार्ग काढताना स्त्रीची जबाबदार भाषा कशी असू शकते याचे प्रभावी चित्रण यात आहे.
पिझान लिखित शहरातील स्त्रीया भक्कम आणि स्पष्ट मुद्देसूद बोलणाऱ्या आहेत . त्या विद्वान ,संशोधक , चित्रकार , दूरदर्शी गूहिणी , अभिमान वाटाव्या अशा मुली एकंदरीत त्यांचे चित्रण आदर्श महिलांचे आहे. त्याहून पुरुषी वर्चस्वाबद्दल अभिमान वाटणाऱ्या इतिहासकारांसमोरची त्यांची प्रतिमा त्याकाळी सुधारणारी होती . मध्ययुगीन स्त्रीची यथार्थ खिडकी उघडणारी अशी ही कादंबरी आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवून जग बदलू पाहणाऱ्या आजच्या स्त्रीच रूप त्यात दडलेल आहे असं म्हणायला हरकत नाही..
सौ.मनिषा राजन कडव
स्त्री मुक्ती चळवळीचा उगम एका पुस्तकातून...! , ही फार उपयुक्त माहिती दिलीत ,
ReplyDeleteस्त्री हक्क चळवळीचा उगम हा एका पुस्तकातून आहे ही ,फार उपयुक्त माहिती दिलीत .
ReplyDelete