नीलची शाळा समरहिल
नीलची शाळा समरहिल
समरहिलच्या शाळेतील स्वातंत्र्य व स्वयंशासन निकोप मानवजातीचं सुंदर भविष्य ....
समरहिल... जगाच्या पाठीवरील एक आगळीवेगळी शाळा .जिथं मुलं लोकसत्ताक पद्धतीने चालवितात स्वयंशासन .जिथं स्वतःच घडवितात स्वतःच व्यक्तिमत्व .एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून सगळ स्वातंत्र्य बहाल केल जात .जिथ पालकांच्या ,शिक्षकांच्या ,समाजाच्या अपेक्षांचं ओझ नसत ...अखंड मानवजातीसाठी आवश्यक असली माणुसकीची जडणघडण साकारणाऱ्या या शाळेन जगाच लक्ष वेधलं...या आंतरराष्ट्रीय शाळेचे निर्माते ए.एस.नील यांनी आपल अवघ आयुष्य या शाळेसाठी समर्पित केलं.या शाळेतील जगावेगळे प्रयोग ,तिथली कार्यपद्धती,समस्याग्रस्त मुलांचे संगोपन आदी विषयांवर भाष्य करणारे ए.एस.नील यांच्या “समरहिल “ या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केलाय हेमलता होनवाड व सुजाता देशमुख यांनी .मराठी वाचक आणि मराठी पालक यांच्या साठी आपल्या पाल्याच्या संगोपनासाठी हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल.
लेखक ए.एस.नील हे स्कॉटिश सरकारी शाळेतील एक शिक्षक.त्यांचे वडीलही शाळामास्तर.सुरुवातीला शिक्षक म्हणून केल्यानंतर काही काळ पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केल.हातामध्ये छडी घेऊन धाक दाखवून मुलं शिकत नसतात उलट ते बंडखोर होतात आणि शालेय प्रवाहातून बाजूला होतात हा त्यांचा अनुभव .मुलांच्या अंतर्मनाचा आवाज ओळखून त्यांना स्वतःच्या पद्धतीने फुलण्याच स्वातंत्र्य त्यांना बहाल करायचं या निर्णयावर पोहचून त्यांनी समरहिल ची स्थापना केली.पाच विद्यार्थी सोबत घेऊन सुरु झालेल्या या शाळेच्या जाहिरातीमध्ये लिहीलं होत ..इतर शाळांना जी त्रासदायक,समस्याग्रस्त,आळशी,मंद,समाजकंटक वाटतात अशा मुलांनी आपल्या शाळेत यावं.याच दरम्यान नील च ‘द प्रॉब्लेम ऑफ चाईल्ड” हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि यातील लिखाणाने शिक्षणक्षेत्रात आणि समाजातही खूप खळबळ माजवली.आठ वर्षात चार आवृत्या निघाल्या आणि आंतरराष्ट्रीय वाचकवर्गही मिळाला.या पुस्तकाच्या अनेक भाषांतरित आवृत्या आणि जगभारतील लोक समरहिलला भेट देण्यास येवू लागले.आता समरहिल शाळा केवळ प्रयोगशीलशाळा च नव्हती तर एक आदर्श शाळा झाली होती.१९२६ साली नील ने समरहिल वर आधारित एक पुस्तक लिहील ज्याच नाव होत ...”ती भयानक शाळा.”यात शाळेतील लोकशाही,स्वेच्छेने वर्गातील तासांना बसण्याची मुभा आणि त्याबद्दलच तत्व ,प्रौढ आणि मुलांमधील नात .सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी शाळेत जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या संधी याबद्दल सविस्तर लिहील होत.प्रस्थापित शिक्षण पद्धती व उद्दिष्टांची नील ला घृणा वाटू लागली म्हणूनच कि काय शिक्षणाची दिशा बालकेंद्री व्यवस्थेकडे वळविण्याची गरज वाटू लागली .
खर तर समरहिल हे पुस्तक नीलच्या इतर चार पुस्तकांच्या महत्वाच्या भागच संकलन आहे.ही पुस्तके नील च्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर लिहिलेली असल्याने जवळजवळ तीस वर्षाचा काळ आणि प्रसंग त्यात समाविष्ट होतो.त्यामुळेच त्यात विसंगती असली तरी मुलांच्या स्वातंत्र्याचा मुलभूत गाभा मात्र एकच आहे .सुरुवातीला हे पुस्तक छापण्यास नकार देणाऱ्या प्रकाशकांनी नंतर मात्र स्वतःहून आवृत्या प्रकाशित केल्या यातच या पुस्तकाची महती आपल्याला जाणवते.लेखकाच्या विचारांचं तत्वज्ञान अनेकवेळा तळमळीन स्वीकारलं जायचं मात्र ती संवेदनशीलता आचरणात येत नसे.
समरहिल पुस्तकाचे एकूण सात भाग पडतात.१) समरहिल शाळा २)मुलाचं संगोपन ३)लैंगिकता ४) धर्म आणि नीतीनियम ५) मुलांच्या समस्या ६) पालकांच्या समस्या आणि ७) प्रश्न आणि उत्तरे अशा सात भागात प्रत्यक्ष आलेले समृध्द अनुभव मांडलेले आहेत.ह्या अनुभवांना फक्त शब्दांचा साज नाही तर प्रत्यक्ष कृतीतून साकारलेल मुलाचं भावविश्व रेखाटले आहे.लेखक म्हणतात मुलं कधीच समस्याग्रस्त नसतात समस्यांनी बाधलेले असतात ते पालक.आपल्या समस्या ते मुलांवर लादतात.पालक ,शिक्षक,समाज मुलाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व मानायला तयार नाहीत.स्वतःच्या इच्छा आकांक्षा ते मुलांवर लादतात.मुलाचं एक स्वतःच विश्व असत त्यांच्या कल्पना असतात,त्यांच्या डोळ्यांत स्वतःची स्वप्ने असतात हे सगळ आपल्याला माहित असूनही आपण सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःची अपूर्णता मुलांमध्ये शोधली जाते .इथवर आपण थांबत नाही तर आपल्या अपूर्ण इच्छा त्यांच्यावर कळत नकळतपणे लादतो .त्याला शिक्षण ,संस्कार,मूल्ये,शिष्टाचार अशी गोंडस नावे देवून स्वतःची समजूत काढतो.याला सर्वप्रथम छेद देवून मानसशास्रीय दृष्टीकोनातून जगाला दाखविला. आजही मुलांच्या मानसिक व भावनिक निरोगीपण यापेक्षा आपण भौतिक यश ,स्पर्धात्मक जीवन ,त्यातून मिळणारे मान सन्मान याच गोष्टीना महत्व देतो.प्रस्थापित शिक्षण पद्धती ह्या केवळ पद, प्रतिष्ठा ,संपत्ती मिळविणे ,इतरांवर वर्चस्व गाजविणे आदी गोष्टींसाठी तयार केली गेली कि काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक व सातत्याने इतरांवर अवलंबून राहण्याची मानसिकता स्विकार्य नक्कीच नाही.बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कौटुंबिक सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललेले आहे.मानवी जीवनात तंत्रज्ञानाचा वाढता हस्तक्षेप पाहता विवेकी व सहिष्णू पिढी समरहिलची शाळा घडवू शकते.
समरहिलच्या शाळेत पाचव्या वर्षी शाळेत येतात तर काही पंधराव्या वर्षीही येतात.सोळाव्या वर्षापर्यंत शाळेत राहतात.मुलांची वयोगटानुसार तीन गटात विभागणी केली जाते.इथ वेळापत्रक आहे पण ते विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर शिक्षकांसाठी.तासाला बसन मुलासाठी ऐच्छिक असत.ते तासाला बसू शकतात किंवा बाहेरही खेळू शकतात.जी मुल सुरुवातीपासून इथ असतात ते तासाला हजर असतात .इतर शाळेतुन आलेली मुल अनेक महिने तासाला बसत नाही .बहुतेक वेळा मुलांचे तास त्यांच्या वयानुसार व आवडीनुसार होतात.शाळेला गणवेश नाही मुलांना हवे ते कपडे घालू शकतात.इथ मुलांना मुलांसारख वागण्याची मुभा आहे.यामुळेच शिस्त,मार्गदर्शन ,सूचना,नैतिकतेच्या शिकवण्या,धार्मिक शिक्षण या गोष्टीना फाटा दिलेला आहे.प्रत्येक मुल हे चांगलच असत ते कधीच दृष्ट नसत यावर इथल्या शिक्षकांचा व कर्मचारी वर्गाचा विश्वास असतो. शाळेत शिक्षक, विद्यार्थी,कर्मचारी सर्व समान पातळीवरची असतात त्यामुळे कुणाला घाबरणे याचा प्रश्नच येत नाही.या शाळेत परीक्षा घेतली जात नाही कधीतरी घेतली तर ती गमतीदार असते.
समरहिल शाळेत दर आठवड्याला मुलांची एक सर्वसाधारण सभा असते.त्यात शाळेचे नियम मतदान करून ठरविले जातात.प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकालाही एकच मताचा अधिकार असतो.सर्वाना समान हक्क आहेत.अगदी नीलच्या आणि एखादा विद्यार्थ्याच्या मताची किंमत सारखीच.सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष पुढील सभेचा अध्यक्ष ठरवतो.मुलाचं खाणपिण सुद्धा त्यांच्या आवडीनुसारच दिल जात.इथल्या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी इथ खाजगी भेटीची योजना असते.खाजगी भेट म्हणजे शेकोटी भोवती बसून मनमोकळेपणाने मारलेल्या गप्पा.ही शाळा जगातील सर्वात आनंदी शाळा असू शकते असे नील म्हणतो.शाळेतील मुलांना क्वचित कधीतरी घरच्यांची आठवण येते.
समरहिल शाळा स्वयंशासित शाळा आहे.लोकतंत्र हि पद्धत शाळेने स्वीकारली आहे.जीवनाशी,गटाशी किंवा समाजाशी निगडीत प्रत्येक गोष्टीचा निर्णय शानिवारी होणारया सभेत घेतला जातो.शाळेत विविद खेळ घेतले जातात .पण त्यात स्पर्धा नसते.आणि कोणत्याच खेळत कौशल्याची गरज नसते.प्रत्येक मुलाला नैसर्गिक रित्या विकसित होण्याची संधी दिली जाते.जी सर्वसाधरण शाळेत नसते.मुल स्वतः नाटक लिहितात स्वतःनेपथ्य करतात आणि अभिनय देखील करतात.
समरहिल या पुस्तकात पहिल्या भागात शाळेविषयी ,शाळेतील उपक्रम ,आदी गोष्टींची सविस्तर उदाहरणासह माहिती दिलेली आहे.उर्वरित पाच प्रकरणात मुलांचे संगोपन,मुलांच्या व पालकांच्या विविध समस्या,लैंगिकता ,धर्म आणि नितीनियम आदी बाबींवर सखोल प्रकाश टाकला आहे.शेवटच्या प्रकरणात या शाळेबद्दल नेहमी उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे स्वतः लेखकाने दिली आहे.
ब्रिटीश सरकारी निरीक्षकांचा अहवाल तर खूपच वाचनीय आहे.प्रस्थापित शाळा आणि समरहिल शाळा यातील अंतर दाखविणारा हा अहवाल खूप काही सांगून जातो.
शेवटी पुस्तकाचा लेखक म्हणतो समरहिल च भविष्य हा गौण विषय आहे पण समरहिल च्या उद्देशांच भविष्य मात्र संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत मोलाच आहे.नव्या पिढीला स्वतंत्रपाने विकसित होण्याची संधी दिलीच पाहिजे.स्वातंत्र्य बहाल कारण म्हणजे प्रेम बहाल करण आणि प्रेमामूळच जग वाचू शकेल.
हे पुस्तक वाचताना कितीतरी नव्या गोष्टी भेटतात ज्यांचा आपण कधी विचारही केला नव्हता.मात्र हे पुस्तक प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे.कोवळ्या मनावर आपण किती आणि कसे ओरखडे ओढतो याची जाणीव आपल्याला होते.हेच ओरखडे उराशी बाळगत मुल मोठी होतात .हे ओझ न झेपणारी मुल बंडखोर होतात .मार्ग बदलतात आणि कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था हादरवून सोडतात याला जबाबदार हे ओरखडेच आहेत जे कोवळ्या मनावर अव्यक्त वेदनेच्या स्वरुपात होते.मुलांना स्वातंत्र्य हवं.स्वातंत्र्यातून निर्माण होणारी सर्जनशीलता अपायकारक असूच शकत नाही.....
शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या व येऊ पहाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वाचाव अस पुस्तक ,त्याची छान ओळख करवून दिलीत , शुभेच्छा 💐💐
ReplyDelete