माँर्निग ,नून अँड नाइट .
माँर्निग ,नून अँड नाइट .
अलिकडेच माझ्या वाचनात आलेली माधव कर्वे यांनी मराठीत अनुवादित केलेली
'माँर्निग ,नून अँड नाइट" या कादंबरीतही सिडने शेल्डन यांच्या लेखणीची सगळी वैशिष्ट्य प्रभावीपणे उतरली आहेत. या कादंबरीत हँरी स्टँनफोर्ड या एका अब्जाधीशाच्या प्रचंड मालमत्ते वरून उभं राहणार नाट्य आहे. एका वादळी रात्री हँरी स्टँनफोर्ड त्याच्या बोटीवरुन समुद्रात पडून अपघाती मूत्यू होतो. त्याच्या मूत्यूनंतर मालमत्तेच्या वाटणीसाठी स्टँनफोर्ड कुटूंब एकत्र येत .पाठोपाठ ज्युलिया स्टँनफोर्ड नामक एक तरुणी आपण हँरी स्टँनफोर्डची मुलगी असल्याचं सांगत दाखल होते आणि एकामागोमाग रहस्यमय घटना घडत राहतात , कथानक कलाटण्या घेत धक्कादायक वळणावरून पुढे जात राहतं. आणि सिडने शेल्डन यांंच्या चकित करणाऱ्या प्रतिभेचा प्रत्यय येत राहतो . सिडने शेल्डन आपल्यापुढे प्रतिसूष्टी उभी कळतात. आणि त्यातलं नाट्य ,चढ-उतार, आंदोलन वाचणाऱ्याला संपूर्णपणे एका वेगळ्या जिवंत जगात नेतात.
शेल्डन यांच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथानकात नाविन्य , वेगळेपण असतं तसाच एकूण आवाका ही मोठा असतो ,वेगवेगळे देश -विदेश ,स्थळ ,शहर-गाव ते कथानकाच्या ओघात जाताजाता सहजपणे बारकाईने चितारतात ,वैशिष्ट्य टिपतात. कथानक रंगतदार करण्यात त्यांच्या या कौशल्याचा मोठा वाटा असतो . तसंच वेगवेगळ्या क्षेत्रांचे तपशीलही कथानकाला वेगळी डूब ,पैलू देतात. "माँर्निग ,नून अँड नाइट" मध्येही पोलो सारखा खेळ ,फँशन डिझायनिंग ,औद्योगिक क्षेत्र ,गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे बारकावे येतात.
या सगळ्यापेक्षा ही सिडने शेल्डन यांच्या कादंबऱ्या प्रभावी ठरतात., ते जिवंत व्यक्तिरेखा आणि त्यांच्यातल्या संघर्षामुळे ! छोट्या व्यक्तीरेखाही लक्षणीय करण्याच कसब असंच अप्रतिम आहे. हिंसक वूत्ती ,विश्वासघात त्याचबरोबर ,प्रेम ,निष्ठा ,जिव्हाळा माणसातली जिद्द ,आशावाद ,जगण्यावरच प्रेम अशा वेगवेगळ्या छटा त्यांच्या कथानकामध्ये असतात. आणि "माँर्निग , नून नाइटमध्ये ही या ओतप्रोत भरलेल्या आहेत. माणसाच्या भावभावनांचा एक खिळवून टाकणारा खेळ " माँर्निग , नून अँड नाइट " मध्ये अनुभवायला मिळतो .
सौ.मनिषा राजन कडव.
छान पुस्तक परीचय करवून दिला , 💐💐💐
ReplyDeleteManisha pl tell me what is kadambari? Nicely introduced in short & sweet language. Let's read once get free from my exam..
ReplyDelete