रेज ऑफ एंजल्स
रेज ऑफ एंजल्स...
सिडने शेल्डन...काय लिहितो हा माणूस...किती सहजपणा आहे यांच्या लिखाणात...वाचता वाचत कधी आपण त्या नायिकेच्या भूमिकेत शिरतो हे आपल्याला कळतच नाही. जेनिफर पार्कर..एक तरुण वकील..तिच्या आयुष्यातले चढ उतार इतक्या ताकदीने सांगितले आहे की आपणच जेनिफर आहोत इतकं त्यात गुंतून पडतो..
तिच्या वकिलीच्या सुरवातीलाच तिच्यावर आलेलं बालंट..त्यातून तिला वाचवणाऱ्या अॅडम वॉर्नर सोबत तीच जुळलेलं प्रेम, तिची असामान्य बुद्धिमत्ता, त्यामुळे सगळ्या अडचणींवर मात करून यशस्वी झालेली वकिली, अत्यन्त सुंदर रूप, तिचे आणि अॅडम चे तुटलेले नाते, तिचा मुलगा जोशुआ, नंतर आयुष्यात आलेला माफिया प्रमुख मायकेल मोरोत्ती..त्यात अडकत गेलेली जेनिफर..न शेवटी सगळं संपुन एकटी राहिलेली जेनिफर..अगदी ढसढसून रडायला लावते कैक वेळा.. मला जेनिफरच्या विश्वातून बाहेर पडता येत नाहीये...अजूनही वाचताना आपण पूर्णपणे गुंतून पडतो मी ही पडले...
खूप दिवसांनी काहीतरी अप्रतिम वाचल्याचं समाधान मिळालं आहे...आणि सगळं काल्पनिक असून सुद्धा आता एकटी जेनिफर काय करत असेल हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही...
सिडने शेल्डन सिध्दहस्त लेखक आहेत. ज्या व्यवसायाची पार्श्वभूमी निवडतात त्याचा अभ्यास त्यांनी केलेला असतो आणि कादंबरीत ते वाचकांना जाणवते. इतका खोलात जाऊन आणि घट्ट विणलेला प्लाँट आपल्याला खिळवून ठेवतो.या कादंबरीत जेनिफरचे वकिली कौशल्य, वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला लढा हे फारच वाचनीय आहे.आणि परीस्थिती बदलल्यामुळे तिची झालेली अधोगती, तिची मनोवस्था.. अप्रतिम चित्रण केलेल आहे . या कादंबरीचा तितक्याच ताकदीने मराठीत अनुवाद विजय देवधर यांनी केला आहे.
सौ.मनिषा राजन कडव
छान लिहिले ,शुभेच्छा 💐💐
ReplyDeleteछान पुस्तक परिचय
ReplyDeleteछान पुस्तक परिचय
ReplyDeleteछान पुस्तक परिचय
ReplyDelete