काळी जोगींण

काळी जोगींण 



 नारायण धारप यांचे काळी जोगींण हे पुस्तक वाचले. मूळ कथानक चार पात्रांमध्ये आहे. १ . अच्युत २ गोपाळ ३ नलिनी आणि ४  थे भगत. 
कथा एका अनामिक शक्ती बद्दल आहे जी एका जुन्या पडक्या वाड्यात सामावून राहिली आहे (कधी पासून ते माहित नाही). 
काळी जोगिंण लोकांच्या इचछा पूर्ण करते त्या बदल्यात तिला फक्त काही किम्मत द्यावी लागते असे ऐकून ,अच्युत जेव्हा काळ्या जोगिणी कडे जातो आणि तिच्या जाळ्यात तो फसतो आणि नंतर भगत त्याला तिच्या जाळ्यातून कसे बाहेर काढतात ह्या बद्दल हि कथा आहे. 
नक्की काळी जोगीण कोण आहे हा गोष्टीचा कॅलेमाईक्स आहे. 
....

सुरवातीला कथा  थोडी संथ गतीने चालते... सुरवात अच्युत आणि नलिनी या दोन पात्रासोबत होते..दोघे नवरा बायको आहेत...हालाखीची परिस्थिती असते..त्यात अचानक अच्युत ला एक वेगळाच आजार होतो...तो नेहमी शून्यात नजर लावून बसलेला असतो..कोणी काही विचारले तर एक नाही की दोन नाही...कामावर जाणे नाही की, बोलणे नाही खाणे नाही...डॉक्टर  आदी  सगळं होतो पण कोणालाच कळत नाही की नेमकं अच्युतला काय झाले आहे...आणि आपल्याला ही, 

आणि तिथूनच सुरू होते बिचारी नलिनी ची धावपळ..मुंबई ला वेडांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना.मुंबईत नातलगाकडे राहताना बिचारीचे खूप हाल होतात...पण परिणाम काही नाही...नाईलाजाने ती पुन्हा घरी येते....इथपर्यंत  कथा  वाचायला खूप रटाळ आणि कंटाळा आला...पण अच्युत ला नेमकं झालं काय आहे..हे कुतूहल जाणून घेणेसाठी पुढे वाचत राहिले...
तुम्ही ही वाचा....कुठेपर्यंत..... कथेत ...."काळी जोगीन" हा शब्द येईपर्यंत...एकदा का तिथे पर्यंत पोहचलात तर पूर्ण पुस्तक वाचून झाले शिवाय तुम्हला चैन पडणार नाही...जेव्हा पुस्तकात प्रथम उल्लेख येतो तेव्हा तिथून खरी  कथा चालू होते....

धारप या बद्दल सांगतात की, महत्त्वाकांक्षा हा काही दोष नाही. बदलाची आवड ही सुधारणेची माता आहे. स्वसंतुष्टता अति घातक ठरते. पण साध्य जितकं महत्त्वाचं तितकंच साधनही महत्त्वाचं आहे. महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी कोणी खडतर परिश्रमांची निवड करतो. कोणी नव्या कलाकसबांची निवड करतो, कोणी देशांतर करतो - पण अच्युतने निवडलेला मार्ग वरवर दिसायला सोपा होता; पण तो सोपेपणा फसवा होता.

इथून पुढे जे काही तुमच्या डोळेसमोर येते ना ते खरंच विलक्षण आणि भीतीदायक आहे...धारपांची यातील वर्णन, वाक्यरचना वाचनातं खूप थ्रील अनुभवायला मिळते...

घडीव दगडांच्या प्रशस्त आवारात ते जीर्ण मंदिर समोर आलं. देवाचं मंदिर असेलही एकेकाळी, पण आता ती वास्तू भग्न झाली होती. त्यातलं पावित्र्य गेलं होतं; आता तिथे मनाला धीर देण्याची शक्ती नव्हती; आता त्या कललेल्या, कोसळलेल्या, प्रचंड शीलाखंडांच्या राशीत भीती दडलेली होत. आतल्या अरुंद प्रदक्षिणा मार्गावरून, किंवा उंचा घुमटाच्या आवाज घुमवणाऱ्या गाभाऱ्यात अशा आडवेळी पाय टाकायला मन धजलं नसतं.

एके काळी वाड्याच्या चारी बाजूंनी भिंत होती, पण तिचा बहुतेक भाग पडून गेला होता. पडक्या किडक्या दातांसारखे काही विद्रूप खांब उभे होते. पूर्वी कधी काळी भिंतीच्या आत बाग, फुलझाडांचे किंवा भाजीपाल्याचे वाफे असतील. आता सर्वत्र रानगवत आणि तण माजलं होतं. अच्युतच्या पावलागणिक टोळ आणि रातकिडे हवेत उडत होते, त्यांची किर्रर्र सगळ्या दिशांनी येत होती.

होतं? वास्तू अपवित्र म्हणून तिने निवडली होती का ती आली म्हणून वास्तू अपवित्र झाली होती?

त्याने त्या कपाटाच्या दाराला हात लावला, मात्र... दार आतून जोराने ढकललं गेलं.
 दचकून त्याने समोर पाहिलं. कपाटाच्या कोपऱ्यात ती उभी होती.
 खी: ! खी: खी: ! करून हसत होती. 
क्षणभर त्याचं मन, मेंदू पार कोरा झाला. 
मग सर्व दिशांनी भीती घोंघावत आली. त्याच क्षणी देवळातल्या मोठ्या घंटेचा खण् ! खण् ! खण् ! घंटानाद सुरू झाला. 
ती कपाटाबाहेर पाऊल टाकत होती. 

यासारखे अनेक प्रसंग वाचताना आपण ही त्या वेळी तिथे आहोत आणि सगळ भय अनुभवत आहोत असे वाटते...

  कथा जसजशी पुढे सरकते तसं जाणवते की, दृष्ट शक्ती खूप प्रभावी आहे, खूप शक्तीशाली आहे.. याच्या जाचातून कोणी कस काय सुटणार...पण 

काही दुष्ट शक्ती आहेत, आसुरी वासनांनी रक्तासाठी वखवखलेल्या आहेत... पण त्यांनी काही आपलं जग जिंकलेलं नाही ना? सर्वत्र अनाचार-अत्याचार यांचं थैमान माजलेलं नाही ना? सत्शील, सदाचरणी, सज्जन माणसं आपलं आयुष्य समाधानाने जगत आहेत ना? देवदेवतांच्या पूजा-अर्चा चालू आहेतच ना? म्हणजे जशा दुष्ट शक्ती आहेत तशाच काही सुष्ट, संरक्षक शक्तीसुद्धा असल्याच पाहिजेत, नाही का? आपल्याला त्यांचं साहाय्य नाही - का घेता येणार?’’

आणि तेव्हा या  कथेत  प्रवेश होतो...अश्या व्यक्तीचा जिच्या नावातच अश्या दृष्ट शक्तीमध्ये दहशत आहे...आणि तिथून सुरू होतो संघर्ष...पवित्र आणि अपवित्रमध्ये..चांगल्या आणि वाईटामध्ये...शेवट काय आणि कसा होणार..याची उत्सुकता कथा संपे पर्यंत कायम राहते....
तरीही काही गोष्टी कथेत निरुत्तरितच आहेत.



सौ.मनिषा राजन कडव

Comments

  1. काळी जोगीण ची मोजक्याच शब्दात ओळख करवून दिली...!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.