अधांतरी*लेखिका- सौ.मनिषा राजन कडव

*अधांतरी*
आज असं काय होतय तिचं तिलाच कळतं नव्हतं.  सारख उराशी दाटून येत होत.  डोळ्यातून पाणी वाहत होत.  मधेच हुंदका येत होता.  तिने कितीही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला तरी  हे थांबत नव्हत.   अशी तर तिला या रोजच्या मरणाची सवय झाली होती.   पण आज तिला खुपच असह्य झाल होत.  भांड्याच काळ तिच्या सगळं तोंडाला लागल होत  .  भांडी घासता घासता ती डोळ्यातले अश्रु दंडाने फुसण्याचा प्रयत्न करत होती.
काही अपेक्षा न ठेवता .  ती इथे राहत होती.  सर्व कामे करत होती.  राब राब राबत होती.  पण या लोकांनी फक्त  मोलकरीन म्हणून तिला वागवल होत.   आणी आज तिला घराबाहेर काढणार आहेत.   काय चुकलं तिचं.  तिच्या काहिच अपेक्षा नव्हत्या कोणाकडून तिला फक्त या घरात आसरा हवा होता. तिला कबूल होत तिच्या बाबांनी केलेली फसवणूक .  ती त्याचीच शिक्षा तिथे राहून भोगत होती.  खरंतर तिला आता जगण्यात स्वारस्यच राहिलं नव्हत.  तिला त्याच्याकडून प्रेम तर मिळालचं नव्हत. तरी पण जगण्याचा एक आधार म्हणून ती त्याच्याकडे पहात दिवस काढत होती.   पण आज तेही संपल होत.  आज तिच्या बाबा तिला कायमचे माहेरी नेण्यासाठी येणार होते.  तिला मनापासून वाटत होत त्याने तिला थांबवाव.   ज्याच्यासोबत ती सप्तपदी चालून आली होती.  आयुष्याची सुरूवात तीने ज्याच्यासोबत केली.  त्याने तिला असं अधांतरी सोडू नये असं तिला वाटतं होत.  आज बाबा यायच्या अगोदर ती सगळी कामे लवकर लवकर आटोपण्याचा प्रयत्न करत होती. तरीही कामांना वेग येत नव्हता.  तीने आता खळ्यात शेण सारवायला घेतलं होत.  तेवढ्यात तिची  सवत तिथे येऊन तिच्या अंगावर खेकसते.  
"आता काय झाला ! भरल्या घरात रडाक.  कोणाक पोचवतास आता.  तिच्या या बोलण्यासरशी मंगलाने,  पटापट डोळे पुसायला हात वर केले.  आणी शेणाने भरलेले हात सगळे तिच्या गालाला लागले.  त्याबरोबर तिने पदरानेच सगळं  शेण पुसलं.   आता ती बाबांची वाट पहात होती.
    क्रमशः(पुढील कथा पुढील भागात)
लेखिका- सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.