आई आमुचीही
आई आमुचीही अशी साधी भोळी
तिच्यासाठी गाऊ आज चार ओळी।।धृ॰।।
अंगणात सांडलेला, चांदण्यांचा सडा
तिला पाहताना, जीव होई वेडा
असेल सूर्य मोठा, ज्याची फाटकीच झोळी
तिच्यासाठी गाऊ आज चार ओळी।।१।।
नभात ते सारे, पक्षी दाटलेले
तिच्याविना सुने, काळीज फाटलेले
लागेल का गोड, सांगा पुरणाची पोळी
तिच्यासाठी गाऊ आज चार ओळी।।२।।
अरे ज्ञानदेवा तू,जगा ज्ञानी केले
इवलेसे रोप,मांडवाला नेले
संत उभे दारी ज्यांची माऊलीही काळी
तिच्यासाठी गाऊ आज चार ओळी।।३।।
बाळ इवलेसे, अंगणी झोपविले
नक्षत्रांना तिने,पदरी लपविले
विठू उभा जिथे,संगे मांदियाळी
तिच्यासाठी गाऊ आज चार ओळी।।४।।
कुणी विणलेले हे, रेशमांचे बंध
फुले नाना परी, एकची सुगंध
देहप्राण तीच, सृष्टी तीच डोळी
तिच्यासाठी गाऊ आज चार ओळी।।५।।
आई आमुचीही अशी साधी भोळी
तिच्यासाठी गाऊ आज चार ओळी।।।।.
सौ.मनिषा कडव
सुरेख कविता 💐💐💐
ReplyDelete