समांतर'



समांतर'     
'समांतर' एका बैठकीत वाचून  संपवल आणि अगदी पुढच्या क्षणाला विचार आला की एव्हढ्यात पुस्तक संपलही? सुहास शिरवळकर यांनी अगदी माफक शब्दात ही कथा मांडली आहे. 
"मुळात खरं तर माझी इथे येण्याची इच्छा च नव्हती". कथेच्या ह्या पहिल्या वाक्यापासून कुमार (कथेचा नायक) ची द्विधा मनस्थिती आणि अस्वस्थपणा जाणवायला लागतो. कुमार सारखंच आयुष्य कुणीतरी आधी जगलं आहे, हे समजल्यावर तो 'त्या' माणसाच्या शोधात निघतो आणि अखेरीस त्याला शोधून काढतोही. डायरीतील प्रत्येक पान त्याचा उद्याचा दिवस कसा आहे ते सांगत असतांना कुमार ह्या मध्ये काहीही बदल करण्याचा प्रयत्न करत नाही (जे की तो अंशतः करू शकत होता किंबहुना तसा प्रयत्न करू शकत होता). ज्या कारणाने कुमार 'त्या' माणसाच्या शोधात निघतो, यशस्वी होतो, डायरी मिळवतो, ती कारणं पुस्तकाच्या उत्तरार्धात नाहीशी होत असताना जाणवतात. कुमार कुठेतरी वाहवत जातोय अस जाणवतं. माणूस परिस्थितीमुळे किती हतबल होतो, खचतो हे कुमार च्या सुरवातीच्या आयुष्यवरून दिसते. तसेच पैसा, पद, प्रतिष्ठा ह्या गोष्टी मिळाल्या नंतर माणूस तेच सगळं विसरतोही.
   सुदर्शन चक्रपाणीने त्याच्या घरात घडणाऱ्या विचित्र गोष्टींना दिलेली (वैज्ञानिक) कारणं खरंच पटतात. तसंच, वाफगावकर ची निस्वार्थ मैत्री, कुमारला शेवंटपर्यंत केलेली मदत, हॉस्पिटल मधील त्याचं लहान मुलासारखं ओक्साबोक्शी रडणं हृदयद्रावक आहे.
          आपल्या सारखंच समांतर आयुष्य नशिबात असलेला जो पर्यंत भेटत नाही, तो पर्यंत आधीच्याला मुक्ती नसते. काळ मात्र तसाच पुढे जाणार असतो. असंच समांतर आयुष्य जगायला लावत...
दोन माणसांची आयुष्य समांतर रेषेत गेलीत . एकाचा भूतकाळ तोच दुसऱ्याचा वर्तमानकाळ चालाय . अतिशय उत्कंठावर्धक वाचकाला खिळवून ठेऊन वाचकाला  वाचायला परावृत्त करणारे पुस्तक आहे हे. भविष्य वगैरे न मानणारे या पुस्तकाची चेष्टाही करतील . पण आयुष्यात खरोखरच सस्पेंस , थ़ील अनुभवायघा असेल.तर एकदातरी हे पुस्तक वाचावेच .असे मी म्हणेण.




सौ.मनिषा राजन कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.