नाझी भस्मासुराचा उदयास्त.
हिटलर कोण होता? विश्वयुद्ध - २ का घडले ? हिटलर ने ते का घडवले? तो ज्यू लोकांचा इतका द्वेष का करायचा? त्याने ज्यू ना का मारले? विश्व विजेता होण्याचे स्वप्न पाहणारा... १९४१ पर्यंत त्याने जगाच्या नाकी नऊ आणलेले अशा हिटलर ला अवघ्या ४ वर्षात आत्महत्या करावी लागली असे का झाले? लोकशाही मृत्यू शय्येवर कशी जाते? हुकूमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच डागाळलेले असते का? युद्ध ने प्रश्न सुटतात का? ह्या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे
वि. ग. कानिटकर ह्यांचे नाझी भस्मासुराचा उदयास्त हे वाचल्यावर मिळाली.
हिटलर चे विचित्र यश...
मार्क्सवादाचा निःपात हे एडोल्फ हिटलरचे स्वप्न होते. त्याच्या ज्यू द्वेषाचे कारण ही हे होते की, त्याने ज्यू वृत्तीचा नीट अभ्यास करुन निष्कर्ष काढला होता, निसर्गतः ज्यू हे बांडगूळा सारखे आहेत,ज्या समाजात ज्यू आश्रय घेतो नागरिकत्वाचे सर्व प्रकारचे अधिकार भोगतो, त्या समाजाशी समरस न होता, तो ज्यू तो ज्यू च रहातो
२० एप्रिल १८८९ या दिवशी बव्हेरीया सरहदी वरील ब्राऊन अम इन या गावी एडोल्फ हिटलर चा जन्म झाला, एडोल्फ हा त्यांच्या बापाच्या तिसर्या लग्न संबंधातून झालेला तिसरा मुलगा. वडिलांची इच्छा एडोल्फ शिकून आपल्या प्रमाणे सरकारी अधिकारी व्हावे अशीच होती. मात्र सरकारी अधिकारी व्हावे असे एडोल्फ ला वाटत नव्हते आणि नियतीने हि त्याच्या नशिबी काही तरी वेगळेच लिहिले होते. शाळेतील आठवणी पैकी त्याचा आवडता विषय इतिहास, फक्त इतिहास आणि त्या विषयाचे त्याचे शिक्षक डॉ. लेओपोल्ड, त्यांच्या विषयी गौरव करताना हिटलर म्हणतो.. 'माझे खरोखरीच मोठे भाग्य होय की, मला जो इतिहास शिक्षक लाभला तो अत्यंत ज्ञानी होता. त्यानेच माझ्या आयुष्यावर कायमचा परिणाम घडवून आणला. तो त्याच्या सहकार्यांना हेच सांगे आपला इतिहास वाचावा, तर देश वाचेल!
हिटलर च्या वयाच्या 13 व्या वर्षी लंग हेमरेज ने त्याच्या वडिलांचे निधन झाले. याच सुमारास हिटलर हि आजारी पडला. त्याचा हा आजार वडिलांच्या वळणा वर जाण्याची धास्ती असल्यामुळे डॉक्टरांनी एक वर्षभर त्याला शाळा सोडायचा सल्ला दिला. हवा पालटा साठी त्याच्या आईने आपल्या बहिणीकडे त्याला पाठवले. शाळेत जाणे बंद होणार या कल्पनेने हिटलर ला इतका आनंद झाला कि त्या दिवशी प्रथमच त्याने मधयप्राशन केले, झिंगून तो रस्त्यावर पडला, शुद्धी वर आल्या वर झाल्या प्रकाराची त्याला इतकी शिसारी आली की, पुन्हा माद्याला स्पर्श न करण्याची त्याने प्रतिज्ञा केली, त्याने केवळ माधयच नव्हे तर तंबाखू सेवन व मांसांहारही वर्ज्य केले. त्याला कोणते ही व्यसन पुढे ग्रासू शकले नाही.
जगाला युद्धाच्या खाईत लोटणारा आणि रक्ताचे पाठ वाहणारा हा हिटलर मांसाहार आणि तंबाखू सेवन ह्या व्यसनांपासून संपूर्णपणे अलिप्त होता,हि गोष्ट अविश्वसनीय वाटत असली तरी संपूर्णतः खरी आहे.
रिकामपणाच्या अवस्थेत त्याने वाचनाचा ध्यास घेतला. जर्मनीचा इतिहास आणि पुराणे या दोन गोष्टींचे वाचन त्याने मोठ्या प्रमाणावर केले. वाचनालयातून त्याने या विषयावरील पुस्तके वाचण्याचा धडाकाच लावला.
आईच्या निधनाचा एडोल्फ वर फार मोठा परिणाम झाला. आईच्या निधनानंतर १९०९ मध्ये हिटलर ने व्हिएन्ना मध्ये पाऊल टाकले. तिथे त्याने पुढील शिक्षणासाठी कुठे प्रवेश हि घेतला नाही कींवा कुठे नोकरी हि पत्करली नाही, आज हा तर उद्या तो असे अनेक व्यवसाय त्याने करुन पाहिले. कधी रस्त्यावरचा बर्फ उचलण्याचे काम, कधी गालिचा साफ़ करायचे काम, कधी स्टेशन वर हमाली, कधी इमारती च्या बांधकामाच्या जागी विटा वहाव्यात असे रोजगाराचे काम तो करीत असे.
पुढे १९१३ साल उजाडले. हिटलर या वेळी कसा होता? मित्र नव्हते, कुटुंब नव्हते, घर नव्हते, नोकरी नव्हती. पोटाची खळगी कशी भरेल ह्याची भ्रांत होती. व्हिएन्नातील पाच वर्षात त्याने मिळवले तरी काय?त्याला फक्त एकच साक्षात्कार झाला की या जगात जाणार्या असंख्य कीटकांन प्रमाणे जगण्यासाठी आपला जन्म नाही. आपल्या वर देशाचे काही तरी उत्तरदायित्व आहे. ह्या विचाराने त्याने व्हिएन्ना सोडले व तो म्यूनिचला आला, म्यूनिच ला येऊन त्याने आपले बस्तान बसवण्यापूर्वी १९१४ च्या उन्हाळ्यात यूरोपात युद्ध भडकले.
जर्मनीने देशातील तरुणांना हाक दिली, ऑगस्ट १९१४ मध्ये हिटलर ने बव्हेरियाचे राजे लुडविग यांच्या कडे आपणांस सैन्यात दाखल करुन घ्यावे, असा अर्ज केला आणि त्याची सैन्यात भरती झाली.
२५ वर्षाच्या हिटलर च्या आयुष्यातील निराशेचा, कंगाल अवस्थेचा काल अचानक संपला ज्या युद्धाने युरोपात लाखो जिवांचा बळी घेतला ते युद्ध सुरू होताच एका तरुणाला अत्यानंद झाला.
पुढे १९१८ मध्ये जर्मनी ने शरणागती पत्करली, कैसर राजा राज्य त्याग करुन हॉलंड मध्ये पळून गेला जर्मनी ने युद्धात पराभव मान्य केला होता. हे वृत्त ऐकुन हिटलर पुरता निराश हतबुद्ध झाला. सगळा त्याग, सगळे कष्ट मातीमोल झाले लाखो जिवाचे प्राणार्पण व्यर्थ ठरले, एकाद्या हरामखोरांन च्या टोळीला आमच्या मातृभूमि वर दरोडा घालता यावा म्हणून का येवढे महायुद्ध घडले हि भावना हिटलर च्या मनांमध्ये घोंगावू लागली. प्रस्थापितांच्या प्रति त्याच्या मनामध्ये प्रचंड द्वेषाची भावना निर्माण झाली. 'जर्मन जनतेच्या पाठीत ज्यानी खंजीर खुपसला त्यांना शासन घडल्या खेरीज आता विश्रांति नाही असा ध्यास च त्याने घेतला. हिटलर ने ठरवले त्याचे भवितव्य आता त्याला स्पष्ट झाले त्याने राजकारणात पडण्याचे नक्की केले....
योगायोगाने हिटलर 'जर्मन वर्कर्स पार्टी' चा सभासद झाला. त्याने फारच कमी वेळात आपल्या वक्तृत्व गुणांमुळे स्वतः चे वर्चस्व स्थापन केले छोट्याश्या संघटनेचे रूपांतर लवकरच हिटलर ने वक्तृत्व कौशल्याने मोठ्या पक्षात केले.
हिटलर सांगत असे ज्याला जनसंमर्द हेलावता येतात त्यानेच नेते पद मिरवावे. सामान्य जनतेला फक्त कल्पना पुढे मांडणे पुरेसे नसते. राजकिय यश मिळविण्यासाठी या कल्पना साकार करतील आणि पक्षावरील श्राद्धा अधिकाधिक बळकट करतील अशी बोधचिन्हे, शिस्तीचे आणि सामर्थ्याचे उत्सवी प्रदर्शन सामर्थ्याचा प्रत्यय आणून देणार्या काही हल्लेखोर घटना या सर्वांचा कुशलतेने वापर करणे आवश्यक असते.
हिटलर ने हेच ओळखून पक्षाला आकर्षक निशाण उपलब्ध करुन दिले. जनतेच्या कल्पनाशक्ती ला आव्हान करील असेच हे निशाण होते. लाल रंगाच्या निशाण्यावर मध्य भागी पौर्णिमेच्या चंद्रा सारखा पांढरा गोल आणि ह्या गोलात काळे स्वस्तिक. हे पक्षाचे निशाण म्हणून स्विकारले गेले. हे स्वस्तिक आर्य अंशाच्या जया करता धडपडत असल्याचे प्रतीक असल्याचे हिटलर मानत असे.
ह्या ध्वजा वरील स्वस्तिक चिन्ह हे पुढे नाझी जर्मनी चे बोधचिन्ह बनून शांततावादी दुर्बल राष्ट्रांना कर्दनकाळ भासू लागला.
हिटलर ने व्यायाम आणि योग च्या नावाखाली जागोजागी तरुणांचे गट उभे केले. त्यातून तरुणांची स्वयंसेवक संघटना उभारली. S. A. आणि तुफानी दल ह्या सैनिकी संघटना पक्षाच्या नावाने हिटलर ने सुरू केल्या. ह्यांच्याच जोरावर पुढे जाऊन हिटलर ने जगाचा मोठा संहार केला.
धूर्त,चाणाक्ष, चतुर, कपटी, विनाशी, अविचारी, सैतानी एक ना अनेक चांगले वाईट विशेषण ज्याला लागु पाडतील असा विलक्षण विचित्र रसायन असलेला एडोल्फ हिटलर ह्याने जर्मनीला अभूतपूर्व शक्तिमान करुन सोडले, कधीही जिंकली नव्हती येवढी भूमि जर्मनी ने हिटलर च्या राज्यकारभारात आपल्या वर्चस्वाखाली आणली. हे घडते तोच हे साम्राज्य एकाएकी संपूर्ण पणे उमलून पडले कि, जगाच्या इतिहासात असा जय आणि पराजय कुणा राष्ट्राने कधी अनुभवला नव्हता.
एडोल्फ हिटलर च्या काही चुकांमुळे व त्याच्या पाठीमागे आंधळेपणाने गेल्याचे पाप केल्यामुळे दुसर्या महायुद्धाच्या वेळी ज्या जर्मन पितृभूमि साठी हिटलर ने लाखो जिवांची बाजी लावली तिचे सरतेशेवटी अवस्था छिन्नविछिन्न झाली....
सामान्य मुलगा ते नाझी जर्मनी चा भाग्य विधाता आणि चांसलर पदा पर्यंतचा हा हिटलरचा प्रवास थक्क करणारा आहे.
१००० वर्ष तरी अस्तित्वात राहील असे भाकित केलेले हे जर्मन साम्राज्य फक्त १२ वर्ष, ३ महीने, आणि ६ दिवसात नामशेष झाले.
सौ.मनिषा राजन कडव
छान परीक्षण लिहिले.💐💐💐
ReplyDeleteपरीक्षण अप्रतिम
ReplyDelete