गवत्या
गवत्या
प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण कधी ना कधी येतात जेव्हा त्याला स्वतःविषयी प्रश्न पडतात. मी कशाला आलोय या जगात ? मी का नोकरी करत आहे ? म्हणजे काय करणार आहे त्यातून मी कशाकरिता जगत आहे ? कालांतराने आपण एकतर ते प्रश्नच विसरून जातो किंवा मग यांची उत्तरे आपल्याला मिळालेली असतात. मिलिंद बोकिल लिखित गवत्या कादंबरीत हेच आहे . पण लेखकांने त्यांंच्या शैलीमध्ये मांडताना इतक सुरेख मांडलय की आपण कधीतरी त्याच्याशी एकरुप होऊन जातो हे कळतच नाही . कधीतरी कुठेतरी हे जाणवतं काही आपणच आहोत.... या डोंगराजवळ ,नदीकिनारी , याएकांती, आपलच प्रतिबिंब या पुस्तकात उमटल्या सारख वाटत जातं वाचकाला कुठे ना कुठे आपण यात आहोत अशी जाणीव होण हीच लिखाणाची कला आहे. या कादंबरीत आपण आपल आयुष्य जगत असतो. असंच म्हणाव लागेल.
कादंबरीची सुरुवात होते सोंडूर गावापासून तिथले काम करताना कादंबरीचा नायक आनंद त्या गावातल्या तसेच इतर आसपासच्या गावातल्या लोकांशी मिसळून जातो. तो काही मोठी काम करीत नाही . अथवा कुठल्या मोठ्या पदावर ही नसतो.पण त्याच्या स्वभावामुळे सर्व गाववाले त्याला आपल्यातलाच समजतात. गवत्या हे त्यांच्या खिडकीसमोर असलेल्या गवताळ भागाच त्याला सांगितलं गेलेल नाव . त्याकडे एकसारखं बघत राहणं, , त्यांच्याशी गप्पा मारणे आनंदला खुप आवडतं. इतरही काही ठिकाण असतात. नदीचा डोह, एक छोटी गुहा जिथे फक्त बसून राहतो. जे काही मनात विचार येईल ते येऊ देत, आपण स्वतःहून काही विचार नाही करत . त्यात मग भूतकाळातल्या गोष्टी आठवतात. घरातली माणसे , आपली आई , बिल्डिंग मधली माणसे. , जिच्यावर प्रेम होत ती अनू आणि बरंच काही .कशा आपण एक एक नोकऱ्या करीत गेलो, सोडत गेलो, कसा एकाही गोष्टीत रस नव्हता आणि पंडितरावांच्या ओळखीने कसे या गावात आलो हे सर्व आठवत असताना .कधी दुःख होत स्वतःला पळपुटे समजतो तर कधी बरं वाटत त्या सर्वांपासून दूर आलो तो . अशात त्यांची ओळख होते गुरुजींशी एक संत माणूस .सर्व गाव ज्यांचा आदर करतो . त्यांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही. अशा गुरुजींचे पट्टशिष्य आनंद बनतो. त्यांच्या सहवासात त्याला बरीच उत्तरे मिळतात. दर पंधरा दिवसांनी त्यांना भेटायला जातो. गुरुजींसोबत चालणारी अध्यात्मिक चर्चा ,, घारपुरे यांनी सांगितलेल ब्रम्हचर्य पालन, बाज्याने सांगितलेल्या गावातील गोष्टी, यासर्व गोष्टींंनी ही कादंबरी आपल्यालाआपल्याच विषयी विचार करायला लावणारी आहे.
तुंगाबाईच्या पर्वतावर गेल्यावर आनंदला जी अनुभूती होते तिचा अनुभव आपण कधी ना कधी घेतला असतो किंवा घेणार असतो. म्हटल तर आपण सर्वाचात आहोत. म्हटल तर आपण कशातच नाही. हाच तो अनुभव असतो. लेखकांनी तो आपल्या शब्दांत मांडलाय आपण कदाचित त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगू एवढचं, पण अनुभव तोच असेल . अगदी निश्चल मनात आणल तर त्या प्रवाहाचा भाग होऊ शकतो. नाही तर असेच स्तब्ध उभे राहू शकतो. ज्यांच हे त्यांच्यावर आहे .
थोडीशी विनोदी ,बरीचशी अध्यात्मिक आणि कुणाच नशीब कुणाला कुठे घेऊन जाईल हे सांगणारी ही कादंबरी आहे. आपणही हे अनुभव कधी ना कधी घेतले असतील. वाचल्यानंतर आपल्याला समजेलच
सौ.मनिषा राजन कडव .
छान पुस्तक परीक्षण 💐💐💐
ReplyDelete