पुस्तक: मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा.



पुस्तक: मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा.
पुस्तक: मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा हे लेखक: जिम ट्रीलिज यांनी लिहिलेले व  याचा मराठीत अनुवाद: डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी केलाय.डायमंड प्रकाशनाने प्रकाशित केलेल हे पुस्तक,अनेक सर्वेक्षण व संशोधन करून लिहिलेले एक संशोधनात्मक पुस्तक आहे हे.पालक आणि शिक्षकांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक!

वाचन आणि श्रवण हे ज्ञान संपादनाचे दोन महत्त्वाचे मार्ग. मुले लहान असताना स्वतः वाचू शकत नाहीत परंतु ते ऐकू शकतात.किंबहुना त्यांची या काळातली श्रवणशक्ती व ग्रहण शक्ती अतिशय तल्लख असते.अगदी लहानपणापासून मुलांना वाचून दाखवल्या मुळे मुलांच्या बौद्धिक विकासात मौलिक भर पडते. मुलांना वाचनाची गोडी लागते. त्यांच्या शब्द सामर्थ्यात विलक्षण वाढ होते. त्यांच्यातील आकलनक्षमता सर्जनशीलता विकसित होते.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन कौशल्याचा विकास होणे अत्यंत महत्वाचे ठरते.

  मुलांचे वाचन कौशल्य विकसित करण्याचे समग्र तंत्र, त्या मागचे शास्त्रीय संशोधन याविषयी पालकांना, शिक्षकांना सहज सोप्या शब्दात ओळख हे पुस्तक करून देते.

      या प्रक्रियेतील पालकांच्या विशेषतः वडिलांच्या भूमिकेचे महत्व पटवून देते.हे जगभरात गाजलेले पुस्तक प्रत्येक मराठी पालकाने, शिक्षकांनी वाचले पाहिजे असे आहे

   या पुस्तकात एकेक प्रश्न विचारला आहे आणि त्याचा नंतर उहापोह केला आहे. जसे पृष्ठ क्रमांक ३५ चा प्रश्न! "गर्भातील शिक्षण ही दंतकथा आहे का?"या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी मानसशास्त्रज्ञ अंथनी डेकॅस्पर (नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ) व जर्मनी येथील संशोधकांनी केलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष सांगून लिहिले की "हे सर्व प्रयोग सिद्ध करतात की आईच्या गर्भात असतानाच अर्भकाला निश्चित अशा आवाजाचा परिचय होतो. त्याची त्याला सवय होते .अशा या परिस्थितीत आवाजाचा ते मूल सुख समाधान आणि सुरक्षितता यांच्याशी संबंध जोडते. म्हणजेच आईच्या गर्भात असल्यापासूनच बाळाला आवाज ओळखण्याची सवय लावण्यात येते. ही प्रक्रिया म्हणजे त्या बाळाचे प्रारंभिक शैक्षणिक धडे असतात!पण या आईने हे पुस्तकं मोठ्या आवाजात वाचायला हवेत.

या पुस्तकातील काही प्रश्न

१.लहान मुले जेव्हा फेसबुक, ट्विटर वापरतात किंवा जेव्हा ऑनलाईन असतात, तेव्हा ते वाचत नाहीत का?

२. सर्वोत्तम वाचक कोणत्या देशांमध्ये आहेत?

३. वाचून दाखवण्याचे फायदे दर्शवणारे काही संशोधनात्मक पुरावे आहेत का?

४.बालवाडीत प्रवेश घेणाऱ्या मुला-मुलींकडे शिक्षणाची तयारी म्हणून किमान कोणती कौशल्ये असली पाहिजेत?

५. मुलांना वाचून दाखवायला केव्हा सुरू आणि बंद करावे?

६.७.८.९.१०..... असे प्रश्न व त्यांची सविस्तर पुरव्या सह उत्तरे  आहेत. 

हे थोडे वेगळ्या विषयावरील पुस्तक आहे. हे पुस्तक लहान मुलांसाठी नाही तर ज्यांना लहान मुले आहेत किंवा होणार आहेत अशा सर्व पालकांसाठी आहे. ज्यांची मुले १० वर्ष किंवा त्यापेक्षा लहान वयाची असतील त्यांनी सुद्धा नाक्कीव वाचावे. 
यामध्ये लहान मुलांना वाचनाची सवय लागण्याबद्दल पालकांनी करावयाच्या विविध बाबीबाबत सखोल माहिती, शास्त्रोक्त प्रयोग व त्याचे विविध रिझल्ट आहेत. 
पुस्तक खूप मोठे म्हणजे जवळपास ६०० पानांचे आहे. त्यामुळे वाचताना थोडा कंटाळा  येतेो . विशेष म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर हे पुस्तक एखादा PhD थेसिस वाटतो पण तरीदेखील प्रत्येकाने वाचावे असे आहे. 

मुल जन्मल्यापासून, अगदी पहिल्या दिवसापासून त्यांना वाचून दाखवणे हे प्रत्येक पालकाने केलेच पाहिजे असे लेखकाचे मत आहे. मग प्रत्येक वयानुसार कोणती पुस्तके वाचायची व त्यामध्ये कसा बदल करत जायचा याबाबत सखोल मार्गदर्शन केले आहे. पुस्तक वाचून दाखवल्यामुळे मुलांमध्ये घडून आलेले बदल आकडेवारीसह दिलेले आहेत. 

मुलांना त्यांच्या पालकांनी रोजच्या रोज वाचून दाखवणे ज्यामुळे "श्रवण" होते व पुढील सर्व गोष्टी सुरु होतात याबाबत मार्गदशन केले आहे.  
मुलांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीच्या आकलनाची सुरुवात हि 'श्रावण' पासून सुरु होते आणि म्हणून वाचून दाखवणे, (वाचण्यास सांगणे नाही) अत्यंत महत्वाचे आहे. 

अत्यंत उपयोगी आणि प्रत्येक पालकाने वाचावे असे.


माझाअनुभव:
   मी माझ्या मुलांच्या आग्रहावरून रोज किमान एक गोष्ट सांगत असे.काही दिवसांनी गोष्टींचा साठा संपत गेला...मग पुस्तकातून गोष्ट वाचून सांगायला सुरू केले...त्यातून त्यांचे  प्रश्न वाढले.त्यातील अनेक प्रश्न उपस्थित झाले.याचा अर्थ काय हा प्रश्न सर्वात जास्त वेळा विचारला जाई...त्यातून दोघांचाही  शब्द संग्रह भरपूर वाढला.आकलन वाढले आहे.अनेक वेळा माझी मुलं  असे शब्द प्रयोग करून आम्हाला थक्क करतात .... या  पुस्तकाचा मल फार मोठा उपयोग झाला हे मात्र नक्की. 



सौ.मनिषा राजन कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.