बाप नावाची माय

बाप नावाची माय
‘बाप नावाची माय’ हे डॉ. राजेश गायकवाड यांचे आत्मकथन अनेक नाट्यपूर्ण प्रसंग आणि विविध स्वभावधर्माच्या व्यक्तिरेखांनी परिपूर्ण आहे. ही आत्मकथा डॉ. गायकवाड यांच्या वडिलांचे चरित्र आहे. तसेच त्यांच्या गावकुसातील बारा बलुतेदारांचेही अंशत: चरित्र आहे. जमिन विकून मुलांना शिकवणारा अज्ञानी बाप खेडूत असला तरी त्याचे अनुभवाचे शहाणपण अस्सल आहे. लेखकाच्या लहानपणी आईचा मृत्यू होतो. पण त्याच्या वडिलांनी लग्न न करता मुलांसाठी संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या ध्यासात समर्पित केले. म्हणूनच लेखक गायकवाड यांना त्यांच्या बापात आईचे दर्शन घडते.

या आत्मचरित्राची भाषा परभणी परीसरातील बोली भाषा असल्याने ग्रामीण व्यक्तिरेखांचा जिवंतपणा हुबेहुब चित्रित झालाय. पुढे राजेश गाडकवाड यांची ही जीवनकथा संघर्षानी ओतप्रोत आहे. त्यांचा भौगोलिक प्रवास आणि नोकरीचा प्रवास सिद्ध होताना कोर्ट-कचेऱ्या, संघर्ष, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग घडतात. त्या सर्वांचे सुंदर व प्रत्ययकारी वर्णन डॉ. गायकवाड यांनी केलेय. काही प्रसंग प्रचंड विनोदी आहेत. जयश्री पाटील या विद्यार्थीनीचा डबा आणणारा नोकर वर्गात येऊन ‘जयश्री गडकर’ म्हणून संबोधितो - तेव्हा हास्य पिकतो. ‘परी’ या शब्दावर लेखक गायकवाड यांनी केलेल्या कोट्या त्यांच्या वाङ्मयीन सामर्थ्याची साक्ष देतात. या गुणवतेमुळेच कॉन्टिनेन्टल सारख्या दर्जेदार प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केलेय. जीवंत व्यक्तिरेखांची मालिका, बापातील मातृत्वाचा अविट ठसा, ग्रामीण-शहरी संस्कृतीचे हुबेहुब चित्रण, बोलीभाषेचा तडका या गुणामुळे हे आत्मकथन सर्वांग सुंदर झाले आहे.
*सौ.मनिषा राजन कडव.*

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*