प्लेइंग इट माय वे - सचिन तेंडूलकर .

प्लेइंग इट माय वे - सचिन तेंडूलकर .


भारत रत्न आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचे आत्मचरित्र नुकतेच वाचले . खर म्हणजे आत्मचरित्र हे आयुष्याच्या शेवटच्या वळणावर लिहिण्याची पध्दत जगभर आहे. पण सचिन तेंडूलकर  यांच्या नावा भोवती असलेल प्रचंड  प्रसिध्दीच वलय  यामुळे फार लवकर त्याने हे  आत्मचरित्र लिहिले  सेलेब्रिटी मार्केटच्या दबावामुळे  असेच वाटते . क्रिकेट मधील अनेक नवीन जुन्या घटनांना उजाळा मिळाला .अनेक आजारातून ,घटनांतून त्यांनी मिळवलेले यश ,खेळ आणि कौटुंबिक जीवन सांभाळताना होणारी ओढाताण सुरेख मांडली आहे .फोटोपण छान आहेत ्यातूनही अनेक प्रसिद्ध व्यक्ती भेटतात .बोरीआ मजुमदार हे सहलेखक असून मेहता प्रकाशनने हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे .लिटिल मास्टर सचिन तेंडुलकर ने स्वतःच्या शब्दात घेतलेला स्वतःच्या कारकीर्दी चा आढावा. अत्यंत सुंदर पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे.सचिनची जडणघडण वाचणं हा एक खूप आनंददायी अनुभव ठरू शकतो. सचिननं प्रत्येक वेळी दुखापतींवर केलेली मात, त्याची इच्छाशक्ती, खेळावरचं अतोनात प्रेम आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा या गोष्टी पुस्तक वाचताना सातत्यानं जाणवतात.क्रिकेटरत्न ते भारतरत्न… जन्मजात अफाट गुणवत्त्ता प्राप्त होण्याचं भाग्य सर्वांनाच मिळत नाही. भारतरत्न सचिन तेंडुलकर हा अशा भाग्यवंतांपैकी एक म्हणता येईल. त्याने लिहिलेल्या प्लेइंग इट माय वे या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादित आवृत्त्तीतून प्रचंड मेहनती, क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारा, कुटुंबवत्सल, आपल्या कर्तव्यावर श्रद्धा असणारा, देशप्रेमी, टीकेमुळे व्यथित होणारा पण तो राग गिळून आपल्या कृतीद्वारे त्याला उत्त्तर देणारा सचिन प्रत्येक पानागणिक भेटत जातो. सचिनचं वादविरहित आत्मचरित्र हे त्याच्या संयमी स्वभावाचं निदर्शक आहे. ग्रेग चॅपेल यांच्याविषयीचं एक प्रकरण सोडलं तर सचिन वादात पडत नाही. अशा काही मोजक्या प्रसंगात सचिनमधला दुखावलेला आणि त्यामुळे स्पष्टपणे आपली बाजू मांडणारा सचिन समोर येतो. पण असे वाद ही सचिनच्या पुस्तकाची गरज नाही, हेदेखील प्रकर्षाने जाणवतं. कारण त्याच्या या दिमाखदार कारकिर्दीतील असंख्य किस्से, कर्णधारपदाची बिकट वाट, बरे-वाईट प्रसंग, दुखापतींचा ससेमिरा, मित्रमंडळी, संघसहकाऱ्यांशी असलेले आपुलकीचे संबंध याविषयीचं वर्णनच आपल्याला पुरेसं गुंतवून ठेवतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागल्यापासूनचे त्याचे विविध दौरे, त्यातील कामगिरी आकडेवारीच्या रुपात पुढे सरकते तर कधी ती त्यातील प्रसंगांच्या, छायाचित्रांच्या रुपात आपल्यासमोर उभी राहते. मैदानातल्या कामगिरीबरोबरच एक कुटुंबवत्सल असा सचिनही आपल्याला समजतो.वडील रमेश तेंडुलकर, आई, भाऊ यांच्याशी असलेले अत्यंत जिव्हाळ्याचे नाते, पत्नी अंजलीने लाजाळू सचिनला मिळविण्यासाठी लढविलेल्या अनेक क्लृप्त्या आणि नंतर त्याचं लग्नात झालेलं रुपांतर, मुलांचं संगोपन, भरगच्च दौऱ्यांमुळे मुलांचा-पत्नीचा जाणवणारा विरह हा सचिनच्या सुस्वभावी जीवनाचा आणखी एक पैलूही आपल्याला भावतो. आत्मचरित्रातून भेटणाऱ्या सचिनने आपल्या क्रिकेटमधील प्रदीर्घ अनुभवावरून आणखीही पुस्तकं लिहायला हरकत नाही, असं आवर्जून वाटत राहतं. ते लिहिण्याएवढा खजिना त्याच्यापाशी नक्कीच आहे. दोन दशकांची प्रदीर्घ, देदीप्यमान अशी क्रिकेट कारकीर्द ५०० पेक्षा अधिक पानांच्या पुस्तकात बांधायची म्हणजे जिकिराचं काम. सचिन तेंडुलकरनं हे अवघड काम लीलया करून आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

सौ.मनिषा राजन कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*