साद घालतो कालाहारी

फोटो स्त्रोत गुगल -

साद घालतो कालाहारी


सन 1974 च्या दरम्यान मार्क आणि डेलिया ओवेन्स हे अमेरिकी दाम्पत्य आपले घर आणि त्यातील वस्तू विकून थोडे पैसे उभे करतात . आफ्रिकेतील कालाहरी वाळवंटात वन्यजीवांच्या संशोधनासाठी जातात .सुरुवातीला पैशाचे फार पाठबळ नसताना आपले वन्यजीवांवरील संशोधन सुरू करतात .वाळवंटातील हा एकाकी भूभाग तोपर्यत मानवी स्पर्शापासून दूर होता .अनंत अडचणी सोसून तेथे सात वर्षे दोघेही राहतात .या प्रवासादरम्यान बर्याच चांगल्या वाईट प्रसंगाचा अनुभव त्यांना आला. ते सर्व वाचतांना वाचकांना त्या वातवरणात रममाण होऊन एक वेगळं विश्व अनुभवल्याचा आनंद मिळतो. जंगलामधे एक तंबु ठोकुन थोडक्या वस्तु घेऊन उदरनिर्वाह करायचा. सिंह आणि कोल्हे यांचा अभ्यास करतांना अनेक थरारक प्रसंगांचा सामना करायचा. कधी सिंह अगदि ४-५ फुटापर्यंत जवळ येऊन उभे आहेत तर कधी डेलिया ऐकटी असतांना रात्री सिंह तंबुला घेराव घालुन धुडघुस घालताहेत. कधी जोराचा पाऊस येऊन सबंध तंबु वाहुन गेलेला आहे तर कधी जीवनावश्यक वस्तुंची निर्माण झालेली कमतरता आहे. अचानकपणे हजर होउन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारा मित्रसुध्दा आहे. कोल्ह्यांशी निर्माण झालेलं मैत्रीचं नातं, विविध तर्हेच्या पक्षांनी दैनंदिन जीवनात हस्तक्षेप करुन केलेली करमणुक. या सर्वांमधुन जंगलातील जिवनााच्या विविध अंगाचे दर्शन घडते तर कधी जवळच्या मित्राचं आणि भावनिक नातं निर्माण झालेल्या ऐखाद्या कोल्ह्याचा वा सिंहाचा म्रुत्यु हा मनाला चटका लावुन जातो. अनंत अडचणी सोसून तेथे सात वर्षे दोघेही राहतात .तेथील सिंह ,ब्राऊन हायना यांच्या सामाजिक जीवनाबद्दल खूप वेगळी माहिती त्यांना मिळते .तेथील प्राणीही त्यांना आपले मानतात .सिंह ,ब्राऊन हायना त्यांच्या अगदी आजूबाजूला वावरत राहतात .पाण्यासाठी हजारोंच्या संख्येने स्थलांतर करणाऱ्या विल्ड बिस्टची कृत्रिम कुंपणाने झालेली परवड त्यांना दिसते . जगासमोर पोडतिडकीने हे सगळं ते मांडतात .दोघ मिळून ते Cry of the Kalahari हे पुस्तक लिहितात . मंदार गोडबोले यांनी या पुस्तकाचा साद घालतो कालाहारी हा सहजसुंदर अनुवाद केला आहे .विलक्षण अनुभव देणारे हे पुस्तक आहे. 

फोटो स्त्रोत गुगल -
सौ.मनिषा राजन कडव.

Comments

  1. मार्मिक परीक्षण..💐💐💐

    ReplyDelete
  2. छान केलेय परीक्षण👌👌 जरा शुद्धलेखनाकडे लक्ष द्यायला हवं. 😊😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*