हेरगिरीचा पोरखेळ.
हेरगिरीचा पोरखेळ. चांगल्या हेराचं लक्षण म्हणजे तो ज्यांच्यामध्ये वावरत असतो, तिथल्या सामान्य माणसांना तो कुणी तरी वेगळा वैशिष्ट्यपूर्ण माणूस न वाटता त्यांच्यामधलाच एक वाटतो. त्याच्याबद्दलच्या खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. अशा हेरांच्या विविध कथा प्रसिद्धआहेत. हेरगिरीचं विश्व इतकं गूढ आहे, की त्यामुळेच त्याचं बहुतेकांना कमालीचं आकर्षण असतं. जॉर्जिना हार्डिंग यांनी लिहिलेली ‘द स्पाय गेम’ ही कादंबरीही एका हेर स्त्रीच्या कुटुंबावरची, विशेषत: तिच्या मुलांवरची कादंबरी. १९६१ मध्ये लंडनमध्ये कॅरोलीन नावाची एक स्त्री सकाळीसकाळी दाट धुक्यामध्ये गाडी घेऊन बाहेर पडते आणि ती परत येतच नाही. तिच्या लहान मुलांना ती अपघातात मरण पावली एवढंच सांगितलं जातं. हा एवढाच तपशील घेऊन जगणारी अॅना आणि पीटर ही तिची दोन लहान मुलं नंतर कशी वाढतात, आईच्या नाहीसं होण्याचा आणि ती हेर होती, या कुजबुजीचा त्यांच्यावर नेमका काय परिणाम होतो, आपल्या आईचा इतिहास नेमका काय होता. तिचं नेमकं काय झालं याचा शोध घेण्याची प्रेरणा तिच्या मुलीमध्ये कशी निर्माण होते. या घटनेकडे फिरून पाहताना अॅनाला वाटते की, ...