पुस्तकातील मुंबई
पुस्तकातील मुंबई
-----------------------------------
'मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची लंका' असे वर्णन शाहीर राम जोशी यांनी आपल्या एका लावणीतून केले आहे. रामायणातील रावणाची लंका ही सोन्याची होती असे म्हटले जाते. मुंबईसुद्धा सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. त्यामुळे लावणीत केलेले वर्णन मुंबई नगरीला | साजेसे आहे. बहुरंगी आणि बहुढंगी मुंबई नगरी देशाची आर्थिक राजधानी |म्हणून ओळखली जाते. अशा या मुंबईची महती अनेक दिग्गज लेखकांनी आपल्या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे .
पॉकेटस् बुक -
मुंबईचा इतिहास विविध पुस्तकातून मांडण्यात आला आहे. मराठीत 'मुंबई' या विषयावरील अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून गुजराती आणि हिंदी भाषेतही काही पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली आहेत. इंग्रजीमध्येही मुंबईवरील अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सर्वसामान्य मुंबईकर किंवा मुंबईबाहेरून येणाऱ्या पर्यटकांमध्ये 'मुंबईचा वाटाड्या', 'मुंबईचे गाईड' किंवा 'मुंबईचा मित्र' ही पुस्तके सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. या पुस्तकांना बारा महिने मागणी असते. त्याची किंमतही दहा ते वीस रुपये इतकी आहे. सहजपणे खिशात राहू शकणाऱ्या या पुस्तकांत मुंबईतील महत्त्वाची आणि आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे. त्यात मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे स्थानके, गाड्यांचे वेळापत्रक, 'बेस्ट'चे विविध मार्ग, मुंबईचे पिनकोड क्रमांक, हॉटेल्स, चित्रपट व नाट्यगृहे, मॉल्स, महत्त्वाची पर्यटनस्थळे, टॅक्सी आणि ऑटोरिक्षा यांचे भाडेपत्रक यांची माहिती आहे. ही सर्वच माहिती सर्वसामान्यांसाठी उपयुक्त आहे. ही पुस्तके प्रामुख्याने मुंबईतील सर्व रेल्वे स्थानके किंवा पर्यटनस्थळी सहज उपलब्ध होतात.
आपल्या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केली आहे.
विविधरंगी मुंबईची भुरळ सर्वसामान्यांबरोबरच मोठमोठ्या सेलिब्रेटीजनाही पडते. मुंबईत कोणीही उपाशी राहू शकत नाही, असा सर्वांचा समज आहे आणि तो खराही आहे. म्हणूनच दररोज देशातील अन्य राज्यातून मुंबईत लोंढेच्या लोंढे येत असतात. सात बेटांपासून बनलेली ही मुंबई नगरी. मुंबादेवीवरून या शहराला मुंबई असे नाव पडले असे इतिहास सांगतो. आज हे शहर बहुभाषिक असल्याचे म्हटले जाते.
सामाजिक व सांस्कृतिक इतिहास -
ही पुस्तके आकार आणि तुलनेत छोटी असली तरी त्यांचे महत्त्व कमी होत नाही. मात्र या पुस्तकांना साहित्याचा दर्जा मिळू शकत नाही. मुंबईवरील साहित्य किंवा पुस्तकातील मुंबई यावर विचार केला तर मराठी भाषेत या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. गोविंद नारायण
मुंबई शहरावरील मराठी ठसा हळूहळू कमी होत चालला आहे. एके काळी मुंबई हे मराठी माणसांचे विशेषतः आगरी, कोळी, भंडारी ,पाठारे प्रभू चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आदी मंडळींची वस्ती मोठ्या प्रमाणात होती. माडगावकर यांचे 'मुंबईचे वर्णन' हे पुस्तक सर्वात जुने समजले जाते. १८६३ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ज्येष्ठ ..साहित्यिक न. र. फाटक यांचे 'मुंबई नगरी', पु. रा. बेहेरे यांचे 'महाराष्ट्राची मुंबई', उषा हर्डिकर यांचे 'अशी आहे आपली मुंबई', बाळकृष्ण बापू आचार्य यांचे 'मुंबईचा वृत्तान्त' आदी पुस्तकांची नावे घेता येतील. त्याखेरीज वा. वा. गोखले (माझी मुंबई), रतन ठाकूर (बिबस्थानाच्या परिसरात), भा. भि. आजगावकर (मुंबईचा वाटाड्या) अशी पुस्तकेही वानगीदाखल सांगता येतील. या सर्व पुस्तकांमध्ये मुंबईचे तात्कालीक लोकजीवन, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास, नागरिकांचे राहणीमान तसेच अन्य माहिती देण्यात आली आहे. एकेकाळी पालिका मुंबईतील सर्व रस्ते पाण्याने धुत असे, संध्याकाळी एक कर्मचारी रस्त्यावर रॉकेलचे दिवे लावायचा या साऱ्याचे वर्णन वाचताना आज गंमत वाटते.
मुंबईतील त्या काळातील लोकांची वेषभूषा, खाद्यसंस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम याचीही माहिती या पुस्तकांमधून वाचायला मिळते.
मुंबईतील पोलीस, त्यांच्या गणवेशात झालेले बदल, मुंबईतील गुन्हेगारी जगताची माहिती काही पुस्तकातून वाचायला मिळते.
महापालिकेचा ग्रंथ -
बृहन्मुंबई महापालिकेनेही पालिका मुख्यालयाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक अंक प्रकाशित केला होता. हा अंक अत्यंत संग्राह्य असून त्यात मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्य, नाटक, चित्रपट, इतिहास चळवळी आदी विविध विषयांवर मान्यवरांचे लेख आहेत. मुंबईतील काही भाग किंवा उपनगरे या विषयावरही काही पुस्तके प्रसिद्ध झाल आहेत. यात लालबाग (राम नाईक), नाना चौक (मधुसुदन फाटक), आपले गोरेगाव (गोरेगाव विकास समिती), आपले दादर (संपादक बाळ शिरगावकर) आदींचा समावेश आहे. पुस्तकातील मुंबई या विषयाचा विचार करताना शिवसेनेचे दिवंगत नेते प्रमोद नवलकर यांना विसरून चालणार नाही. मुंबईवरील पुस्तकांमध्ये नवलकर यांचे योगदान मोठे आहे. नवलकर हे भटक्या म्हणून ओळखले जात. त्यांनी संपूर्ण मुंबई पालथी घातली होता. मुंबई शहरातील अनेक अज्ञात गोष्टींची माहिती त्यांनी वाचकांना करून दिली होती. नवलकर यांच्या विविध पुस्तकात मुंबई मोहनगर
प्रहार, थैमान, भटक्या, बेधडक, सुरुंग आदींचा' समावेश आहे. नवलकर यांच्या या पुस्तकातून अज्ञात मुंबईची सफर वाचकांना घडते.
इंग्रजी पुस्तके -
पुस्तकातील मुंबईचे हे दर्शन इंग्रजी पुस्तकातूनही घडते. पेंग्वीन, ऑक्सफर्ड, मुंबई विद्यापीठ, इंडिया बुक हाऊस आदी विविध प्रकाशकांनी ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. १८८७ मध्ये प्रकाशित झालेले 'ए शॉर्ट हिस्टरी ऑफ मुंबई प्रेसिडेन्सी' हे मुंबईवरील जुने पुस्तक असावे. मुंबई, स्टोरी ऑफ आयलंड सिटी' (पुसाळकर व दिघे), 'द पोर्ट ऑफ मुंबई ए ब्रिफ स्टोरी' (एस. डी. चित्तार), 'हिस्टरी ऑफ मुंबई' (एम. डी. डेव्हिड), 'हिस्टरी ऑफ मुंबई मॉडर्न पिरियड' (के. आर. चौधरी) तसेच अन्य काही पुस्तकांचा समावेश आहे. जगदीश आग्रवाल यांचे 'मुंबई-ए पिक्चर बुक' हे पुस्तकही आगळे आहे. या खेरीज मुंबईतील हॉटेल्स, मुंबईत विशिष्ट ठिकाणी मिळणारे खास शाकाहारी आणि मासांहारी खाद्यपदार्थ, चायनीज खाद्यपदार्थ आदींबाबत माहिती देणारी पुस्तकेही आहेत. बहुरंगी मुंबईप्रमाणेच पुस्तकातील मुंबईचे जगही मोठे आहे. ही पुस्तके वाचतांना वाचकांना मुंबईची सफर घडते.
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment