चिखल घाम आणि अश्रू
चिखल घाम आणि अश्रू
डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून व आपल्या आवडत्या Man Vs Wild या मालिकेतुन आपणास बिअर ग्रील्स यांची ओळख झालेली आहेच.
अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारा दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला त्यासोबत चिकाटी संकटाशी सामना करण्याची धडपड कधी न हार मानणारा असा हा बिअर ग्रील्स एक अलौकिक व्यक्तिमत्वाचा अजब रसायन असलेला माणूस...
बेअर ग्रील्स म्हणजे असामान्यातला सामान्य माणूस चिखल घाम आणि अश्रु या त्यांच्या आत्मचरित्राततुन आपणास एक अलौकिक अशा व्यक्तिमत्वाची ओळख होत जाते...या आत्मचरित्रातुन शाळेतील सुखी जीवन वीट बेटावर घालवलेला स्वप्नवत काळ कॉलेज जीवन योगायोगाने घेतलेले कराटे प्रशिक्षण वाईटातुनही चांगले होते याचा आलेला अनुभव पुढे जपानची सहल व त्यानंतर प्रयत्नपूर्वक SAS 21 Squad मध्ये निवड होण्यासाठी केलेला प्रयत्न पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो...
आपण आयुष्यात नेमका १००% प्रयत्न करण्याचा सल्ला ऐकत मोठे झालेले आहोत पण या पुस्तकातूनच आपणास समजेल की जीवनात असे काही प्रसंग परीक्षा असतात त्यामध्ये १५० % अविरत प्रयत्न करावे लागतात...
इंग्लिश क्रिकेट टीमला आपण साहेबांची टीम असे म्हणतो. या पुस्तक वाचनातून समजेल की खरा इंग्लिश व्यक्तीमत्वाचा माणुस कसा असतो.
खरे पाहायचे असेल तर बिअर ग्रील्स यांच्या एवढे चांगले इंग्लिश व्यक्तीमत्व नसेल
लष्करी प्रशिक्षण काय असते हे जर जवळुन पाहायचे असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे SAS च्या ट्रेनिंग दरम्यानचा प्रसंग पहाटे ५.५५ ला दररोज उपस्थित रहावे लागायचे जरी एक मिनिट उशीर झाला तरी एक वेळ तंबी त्यानंतर सरळ नापास...
काही सन्माननीय अपवाद वगळता भारतीयाची मानसिकता अशी आहे की आरडाओरडा केल्यावरच काम पुर्ण करायचे मात्र SAS- 21 Squad ही अशी जागा होती की तिथे अशा गोष्टीला थराच नव्हता...
या पुस्तकातील मला खुप आवडलेल वाक्य म्हणजे त्यांचे प्रशिक्षक म्हणतात मुलांनो
आम्ही तुम्हाला नापास करीत नाही तुमचे तुम्हीच नापास होता वेळेवर मात केलीत तरच तुम्ही पास व्हाल ( नेहमीच आपल्याला आलेले अपयश गरीबीला,ग्रामीण भागातील असल्याने, योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, चांगले शाखा किंवा कॉलेज मिळाले नाही व इंग्रजी ची भिती असल्याने )
खरे पाहता वरील कारणापेक्षा आपलीच कच खाऊ वृत्ती अपयशाला कारणीभुत असते हे पुस्तक वाचल्यानंतर मनोमन पटते...
SAS-21 Squad ची कठिण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुखी आयुष्याला नजर लागावी त्याप्रमाणे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी दक्षिण आफ्रिका व झिंम्बाब्वे देशाच्या सीमेलगत Sky driving करतेवेळी भयानक असा अपघात होतो त्यानंतर कित्येक महिने अंथरूणावर पडुन राहावे लागते पाठीच्या मणक्याची हाडे तुटल्याने हा आयुष्यात कधीही चालू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगतले असते!
त्या वेळी ते देवाला विनवणी करतात जर का मी यातुन बाहेर पडू शकलो तर मी या ग्रहावरचा मी एक अत्यंत हुशार व विचारी माणुस होईन कधी कधी आयुष्यात एखाद्या अपघाताने माणसाचे खरे रूप जगासमोर येते...
पण दुर्दम्य इच्छाशक्तीने व प्रचंड मेहनतीने बेअर चालायला शिकतात .
या आत्मचरित्रातुन शिकण्यासारखे बरच काही आहे आयुष्यामध्ये अगदी मोठयातले मोठे ध्येय पण अगदी छोट्या छोट्या लक्ष्या मधुनच पुर्ण करण्याचा प्रयत्न करा नक्कीच यशस्वी व्हाल...
या पुस्तकातुन आपणास समजेल स्वतःवरचा विश्वास पराकोटीचा निर्धार आणि सहनशीलता म्हणजे काय असते ते तसेच कितीही यश मिळाले तरी नेहमी नम्रपणे वागण्याचा प्रयत्न करा सढळ हाताने दानधर्म करून गरजवंताला मदत करा आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका कोणत्याही कामाला टिका असतेच त्यामुळे विचलित होऊ नका संकटकाळी नेहमी डोक शांत ठेऊन निर्णय घेता यायला हवा आणि विशेष म्हणजे तुमच्याजवळ पैसा आहे म्हणून यातील एकही गोष्ट मिळणार नाही हे लक्षात घ्या...
आणि अखेर बिअर ग्रील्स व त्यांच्या टीमने नरक यातना सहन करत माऊंन्चट एव्हरेस्ट चढण्याचे आपले स्वप्न साकार केले
अगदी काही क्षण ते एव्हरेस्ट च्या शिखरावर होते
जगातील सर्वोच्च जागी कुणीही कायम राहु शकत नाही
अगदी असामान्य यश मिळवून ही जमीनीवर पाय असलेला माणूस म्हणजे बिअर ग्रील्स होय....!
या पुस्तकातून काही शिकायला मिळाले ते असे
१) वैयक्तिक प्रगतीसाठी प्रत्येकाने अतोनात कष्ट करायला हवे
२) तुम्ही कितीही मोठे काम करीत असाल तरी सामान्य माणसाशी असलेली नाळ तोडू नका
३) एखादी गोष्ट करण्यापूर्वी शांतपणे आतला आवाज ऐका
४)सुदैवाने आपणास स्वतंत्रपणे जगता येत आहे मात्र नेहमी स्वातंत्र्य व स्वैराचार यातील रेषेचे भान ठेवा.
५) एखाद्या गोष्टीत जरी तुम्ही सर्वोत्तम नसलात तरी चिकाटीने उत्साहाने कराल तर तुम्ही खुप पुढे जाल नक्कीच.
६) आळस,निरुत्साहपणा व अनाठाई भिती माणसाला प्रगतीपासुन दुर नेते.
७) आयुष्यात नेहमी काही तरी शिकत रहावे.
८) आयुष्यात कितीही मोठे यश टप्प्या टप्प्यानेच पुर्ण होते.
९) आपली संगत नेहमी चांगल्या माणसांसोबत ठेवा त्याच्यातील चांगुलपणा आपल्यात नक्कीच येतो.
१०) नेहमी वृत्ती शुद्ध ठेवा (त्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागला तरी) शुद्ध वृत्तीमुळेच शरीर व मन चांगल्या कार्यासाठी प्रेरित होईल.
जिद्द,प्रबळ इच्छाशक्ती,मेहनत,धैर्य, प्रचंड कष्ट,आत्मविश्वास, प्रेरणा,धाडस,प्रेम,साहस,मैत्री,संघर्ष इत्यादी इत्यादी असंख्य शब्दांचे अर्थ आपल्याला बिअर या जीवनगाथेत समजतात..टीव्हीवर दिसणारा हा माणूस प्रत्यक्षात किती अफलातून आणि भन्नाट असेल याची प्रचिती आपल्याला हे पुस्तक वाचून येते.हे पुस्तक वाचल्यावर काय लिहावं आणि काय बोलावं हे समजतच नाही एवढं आपण या प्रवासात गुंतून जातो..पुस्तक वाचत असताना आपण जणू डोळ्याने हा प्रवास बघतोय असा भास आपल्याला होतो..ब्रिटिश स्पेशल फोर्सचा वर्णन वाचत असताना आपण थक्क होऊन जातो तर जेव्हा पॅराशूट अपघातात लेखकाच्या पाठीची ३ हाडे मोडून सुद्धा फक्त १८ महिन्यात बरा होऊन हिमालय पर्वत सर करतो ते सुद्धा फक्त वयाच्या २३ व्या वर्षी तेव्हा तर जिद्द नेमकी कशाला म्हणावे तर ती यालाच याची प्रचिती आपल्याला येते..आजपर्यंत बेअर ग्रील्स यांना आपण फक्त टीव्ही वर पाहत आलेलो आहे .. तो खूप साहसी आहे आणि तो किडे,साप वगैरे काहीही खातो त्यांची एवढीच ख्याती आपल्याला माहिती आहे पण तो त्याच्या खऱ्या म्हणजेच प्रत्यक्षात आयुष्यात कसा होता आणि आहे व त्याने कोण कोणते संघर्ष करून आपल्या जीवनात हे मोलाचे स्थान मिळवले ?? हे आपल्याला त्याच्या या आत्मचरित्रात वाचायला मिळते..माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला या पुस्तकामुळे ,जिद्द आणि धाडस बेअर ग्रील्स यांच्या कडून शिकावे असे मला वाटते...खरे तर हे पुस्तक नाहीच तर हा एखादा ऍक्शन चित्रपट आहे जो सुरुवात पासून शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो ..
वीट या बेटावर तो लहानाचा मोठा झाला..येथेच तो तो नौकानयन शिकला .गिर्यारोहणाची आवड ही येथेच निर्माण झाली .. स्वतःचे रक्षण करण्यासाठी कराटे शिकला.त्यानंतर तो ब्रिटिश एस.ए. एस. मध्ये दाखल झाला ..आधी सांगितल्याप्रमाणे येथील त्याचे ट्रेनिंगचे वर्णन वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची ,चिकाटी आणि सहनशक्तीची परिसीमा गाठून त्याने प्रशिक्षण पूर्ण केले..आफ्रिकेतील पॅराशूट अपघातात त्याची पाठ तीन ठिकाणी मोडली होती .यातून तो उठू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते पण तरीही केवळ अठरा महिन्यात त्यांचे आणि इतरांचे अंदाज चुकवत वयाच्या तेविसाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करतो .पण ही तर असामान्य धाडसाची केवळ सुरुवात होती..मग येथून सुरू झाले जेथे कोणीही जाऊ शकत नाही अश्या ठिकाणी जाणे . संकटांचा मुकाबला करीत जिवंत राहणे.प्रतिकुल परिस्थितीत निसर्गाशी जुळवून घेऊन जिवंत कसं राहायचं याबद्दल इतरांना सुद्धा सांगणे. त्याची ही धाडसे आपण MAN VS WILD या डिस्कव्हरी चॅनेलच्या कार्यक्रमात बघत आलेलो आहोतच..लहान मुलांपासून तर वृद्धापर्यत आज बिअर ग्रील्स ला सर्व ओळखतात त्याने आपल्या कार्यक्रमाने करोडो लोकांना भुरळ पाडली आहे..अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा ते भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इत्यादी अनेक दिग्गजांनी सुद्धा या कार्यक्रमात हजेरी लावली आहे यातच बिअर ग्रील्स यांच्या कार्यक्रमाच व त्यांच्या मेहनतीचा यश आपण समजू शकतो..
लेखकांचा इथपर्यंत मजल मारण्याचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता.प्रत्येक गोष्टीत त्यांना संघर्ष करावा लागला.पण कधीही हार न मानता,संकटाना न जुमानता आपल्या मेहनत आणि जिद्दीने त्यांनी जो मुक्काम आपल्या आयुष्यात मिळवला आहे तो असंख्याना प्रेरणा देणारा आहे..सर्वांनी नक्कीच हे पुस्तक वाचावे आणि जिद्दीने, प्रेरणेने पेटून उठावे आणि आपल्या क्षेत्रातील बिअर ग्रील्स व्हावे ह्या शुभेच्छा...
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment