जननायक बिरसा मुंडा
*जननायक -बिरसा मुंडा* देवाप्रमाणे पुजले जाणारे बिरसा मुंडा आहेत तरी कोण? आपले कार्य आणि आंदोलनामुळे बिहार आणि झारखंडमधील लोक बिरसा मुंडा यांना देवासारखं पुजतात. महानायक बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 मध्ये झारखंडमधील लिहतु या गावी झाला. साल्गा गावातील प्राथमिक शिक्षणानंतर ते चाईबासा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेले. सुगना मुंडा आणि करमी हातू यांचे पुत्र असलेले बिरसा मुंडा यांच्या मनात सुरुवातीपासून ब्रिटिश सरकारविरोधात असंतोष होता. भारतीय इतिहासात बिरसा मुंडा यांना एक नायक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी झारखंडमध्ये क्रांतीकारी कार्य करुन आदिवासी समाजाची दिशा आणि दशा बदलून नवीन सामाजिक आणि राजनैतिक युगाचा आरंभ केला. आपले कार्य आणि आंदोलनामुळे बिहार आणि झारखंडमधील लोक बिरसा मुंडा यांना देवासारखं पुजतात. बिरसा यांनी मुंडा विद्रोह पारंपरिक भूव्यवस्था बदलण्यासाठी केला होता. जमीनदारांकडून आदिवासींचा होणार छळ संपवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. बिरसा यांनी नैतिक आचरणाने शुद्धता, आत्म-सुधार आणि एकेश्वरवादाचा उपदेश दिला. त्यांनी ब्रिटिश सत्तेला नाकारले आणि आपल्या अनुयाय...