कविता

कविता

कविता  धरेच्या मातीत रूजली 
निसर्गाच्या  कुशीत विसावली 

कविता  चांदण्या वेचीत आली 
चंद्रा सवे खेळण्यात रंगली 

कविता  राना वनात नाचली 
पायी बोचती काटे , तीने  फुले वेचली

कविता  संगीतात नाहली 
ताला सुरात गीत गायीली 

कविता  पंख लाऊन उडाली 
आकाशी तीने  झेप घेतली 

कधी  कविता ,  धेनुचे वासरू  झाली  
मायेत ,  प्रेमात  बुडून  गेली 



सौ .मनिषा  राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*