कन्या रत्न
*कन्या रत्न*
कन्या रत्न जन्म तुझा
आईच्या उदरी.........
जन्म घेतलास गं तु कन्या
म्हणुन आईच्या ऊदरातुन |
किती यातना सोसल्या त्या
माऊलीने बघ जरा आठवुन ||
नऊ महिने तिने तुला ऊदरात
ठेवुन तुझा सांभाळ केला |
आणि तुझा ह्या विश्वात "कन्यारत्न"
म्हणुन जन्म झाला ||
किती आनंद झाला घरात
आलीस जणु लक्ष्मी रुपातं |
स्वागतही झालं तुझं घरात सर्वां
साक्षी आनंदि वातावरणातं ||
सांगणं तुला एवढचं आहे की
आरशाची काच तु,तडा नको
जावुन देवु |
आजच्या ह्या जमाण्यात तु
फॅशनच्या दुनीयेत नको गं जावू ||
आई-बापाचा मान राखं तु,
काही झालं तरी त्यांच्या
सोबतचं रहा तु |
बापाचं जीवापाड प्रेम
तुझ्यावर त्यांचा विश्वास घात
कधी करुच नको तु ||
लाडात वाढवीली,लहाणाची
मोठी करीत तुला सांभाळलं |
आता तु लग्न करुन सासरी
जाशील हेच त्यांच्या मनातं
सारखचं फिरु लागलं ||
आईची आभाळा भर माया,
बापाची छाया सदैव तुझ्या
बरोबर असेलं |
तु सासरी नांदतांना आपल्या
घराण्याचं नावं राखशीलं
ह्या सारखं आंम्हाला दुसरं
सुखचं नसेलं ||
तु सासरी वावरतांना नवऱ्याचा
मान मनापासुन राख तु |
सासु सासऱ्यांचा आदर करतांना
त्यांना तुझ्या "आई-वडिला"
समान "मान" तू ||
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment