झुलते लाट किनारी

*भव्य राज्यस्तरीय साहित्य स्पर्धा क्रमांक ९*
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
*नॅशनल लायब्ररी बांद्रा आणि वर्ल्ड व्हिजन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने,सावित्रीबाई फुले रात्रशाळा राज्यस्तरीय साहित्य स्पर्धा क्रमांक ९*
    

*विषय :-आली लाट किनारी* 


*कवितेचे नाव*
*झुलते लाट किनारी*



वाळूवर काढत नक्षी
ती लाट किनारी आली
मी स्तब्ध उभी काठावर
आठवांची वर्दळ झाली !

देहाची नाजूक सळसळ
करते माडाची झावळी
मत्त समीर धसमुसळा 
टाकतो विस्कटून सावली ! 

पैलतीरावर लाटेवरती 
डचमळताना दिसते थोडी
घेऊन इशारे सुकाणूचे 
कुठे निघाली आहे होडी ! 

केशर क्षितीजावर झुलती
बगळ्यांच्या मोहनमाळा
संध्येचा सागरकाठी 
घडे मावळतीचा सोहळा !



सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*