दुरावा
माझा तु आहेस म्हणून
म्हणून तुझ्याशी मी भांडते
ममातील काही दुःख मी तुझ्या पुढ्यात मांडते
रडता येत नाही म्हणून
आवाज कापरा होत असतो
उलट सुलट कधी कधी
बोलुन तुला देत असते
तु धरला अबोला की मीही
मनात कुढत असते
तुही समजून घेत जा थोडे
प्रेम असुदे तुझेही जरा वेडे
तुझ्यामुळेच ओळख माझी
तुझ्यामुळेच माझी जोडी
नको धरू अबोला रूसू नको
लटक्या रागाने बघू नको
तुझ्याशिवाय अपूर्ण मी
दुराव्याने तू वागू नको
Comments
Post a Comment