फडफडे तिरंगा

कवितेचे शिर्पक -*फडफडे तिरंगा*
फडफडे अंबरी उंच तिरंगा झेंडा 
घे प्रणाम आमुचा  विश्व विजयी  ध्वजराजा..।.१।।
"भ्रद्राय राजते" "मुद्रा" रे  तव अंकी
त्या महाप्रतापी  अशोक सम्राटाची.।।..२।।
तव रंग तीन द्योतक  पावित्र्याचे
अन् चैतन्याचे  द्योतक ऐश्वर्याचे...।।३।।
सौंदर्य सत्य आणि शिव ही परब्रम्हाचे
तू दाखविसी आम्हा प्रकटरूप जणू त्याचे....।।४।।
तू प्रतिक अससी अमुच्या स्वातंत्र्याचे 
त्यासाठी  आम्ही साहित्या कष्टाचे ..।।..५।।
तू प्रतीक आमुच्या आशा-आकांक्षांचे 
ज्या फडफड करती सदैव हदयी त्यांचे.....।।.६।।
तू प्रतीक प्रीती आणि  बंधु-भावांचे 
तू प्रतीक  आमुच्यामधील  सख्यत्वाचे.,.…।।७।।
तू प्रतीक राष्ट्रामधील मित्रत्वाचे
तू  प्रतीक मानव-जातीच्या ऐक्याचे...।।८!!
साकार स्वप्न  तू असशील विश्वशांतीचे
तू स्फूर्तीस्थान असशी खरोखर आमुचे.,।।..९।।
दे पंख आम्हा तू कर्तव्य-स्फूर्तीचे
उड्डाण कराया गगनी उच्च  ध्येयाचे...!!..१०।।
सौ.मनिषा राजन कडव
manisha.kadav@gmail.com
मोबा- 9869718659

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*