जगविजेथा बुध्द

*जगविजैता बुध्द*

गौतमा गौतमा सिद्धार्था

तूच मार्गदाता तू जगविजैता


तोडून सारे बंधन पाश

सोडला सारा मोह

मायबाप नि पत्नी मुलं

तू सोडून गेला गृह

जग उद्धारक शांतीदुता

तुज चरणी टेकते माथा !



राजपाट हा सोडून सारा

बनला तू संन्यासी

मानव कल्याणाचे

स्वप्न घेऊन उराशी

ठरला तूच मुक्तीदाता

तूच मानवाचा भाग्यविधाता. !


सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*