स्वातंत्रवीरांना सलाम
*नॅशनव लायब्ररी बांद्रा आणि वर्ल्ड व्हिजन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने*
*सावित्रिबाई फुले रात्रशाळा राज्यस्तरिय साहित्य स्पर्धा स्पर्धा क्रं. १*
*कवितेचे नाव*
*स्वातंत्र्यवीरांना प्रणाम*
दिव्य प्रभा तुझी ती शुक्रास लाजविते |
नेत्रव्दयांत तुझिया विद्युल्लताच विलसे ||धृ||
व्योमीं विनायका तू उड्डाण उंच करीशी |
संचार स्वैर करिशी मेघासवेही रमशी ||१||
वर्षाव तेथ करिसी चैतन्य ओज यांचा |
वर्षाव अमृताच्या कवने मधुर त्यांचा ||२||
"तान्हाजीचा पवाडा " "सप्तर्षि" काव्य "कमला" |
गमली मुकुंद मुरली "मुर्ती दुजी ती" सकला ||३||
वक्तृत्व दिव्य तुझे रणशिंग मजसी गमले |
स्वातंत्र्य युध्द लढण्या पाचारिंते जना जे ||४||
तव लेखणी असे वा ज्वालाग्राही विषारी |
पारदास्य नाशकारी दौर्बल्य क्लैब्य हारी ||५||
जणु रुद्र नेत्र तिसरा ते चरित मॅझिनीचे |
स्वातंत्र्य समर तेंही ज्वालामुखीच भासे ||६||
सशस्त्र क्रांती बीजे स्थापूनी मित्र मेळा |
तू पेरिली पुढे तो स्वातंत्र्य वृक्ष झाला ||७||
तू घेतली उडी ती खंडात तीन गाजे |
स्वातंत्र्य ध्वजही आमुचा मग वादळात डोले ||८||
निजभू स्वातंत्र्य करण्या श्रमलास तू नितांत |
काळाशी खेळलास हाला न धाकलास ||९||
काथ्या कुटावयाला कोलूही फिरविण्याला |
थकला न कधी तू भ्याला तुज पुढची मृत्यू नमला ||१०||
अंधार कोठडीत तव तेज अधिक फाके |
मुर्ती तुझीच आमुच्या हृदयमंदिरात विलसे ||११||
तू राष्ट्र-संत साचा सत्पुत्र हिंदभूचा |
स्वातंत्र्य देवतेच्या घेई प्रणाम आमुचा ||१२||
संपूर्ण नाव - सौ.मनिषा राजन कडव
MA (मराठी), Master of Library science
ग्रंथपाल,डी.एस.हायस्कूल,शीव.
A/16 ओम शिवम कृपा ,कल्याण.
मोबा. - 9869718659
सौ.मनिषा राजन कडव.
Comments
Post a Comment