पावसाच्या धारा

*सावित्रीबाई फुले रात्रशाळा*
*राज्यस्तरीय साहित्य समिती,महाराष्र्ट राज्य*
*नॅशनल लायब्ररी वांद्रे आणि वर्ल्ड व्हिजन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने*

*आला रिमझिम पाऊस*      ....

कवितेचे शिर्षक - *पावसाच्या धारा*

रिमझिम पावसाच्या धारा
अन् उधाणलेला वारा
मोर फुलवी पिसारा
भासे सुंदर नजारा    || १ ||

सृष्टी फुलुनिया येई
मन आभाळच होई
वाटे नाचावे आनंदे
अंगणात थुई थुई    || २ ||

सृष्टी सजली नव्याने
जणू नवीच ग नवरी
गाठ बांधी तिचा शेव
इंद्रधनू मेघावरी   || ३ ||

सृष्टीचे हे नवे रूप
बघ मोहवे मनाला
त्याच्या अस्तित्वाची साक्ष
पटे हर एक क्षणाला    || ४ ||

सरी पावसाच्या बाई
अंगभरी ग झेलाव्या
अंगणात लेकीबाळी
मुक्तपणाने खेळाव्या    || ५ ||

सौ.मनिषा राजन कडव.
एम.ए.(मराठी),एम,लिब.
ग्रंथपाल
9869718659

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*