माऊली रणचंडिके

[14/10, 7:36 pm] my jio no: *ऊठ माउली..रणचंडिके..!*
~~~~


ऊठ माउली..रणचंडिके.. 
जळशी तरी मन का मुके..?
रणचंडिके..!!

माया तुझी साऱ्यावरी..
पण हुंदका वाऱ्यावरी..
तुझिया मनाचे सोसणे..
पाहुनिया ठोका चुके..
रणचंडिके..!!

या आंधळ्या सत्तेमुळे..
बघ जानकी कितीदा जळे..
तू पाजल्या पान्ह्यावारी..
का ही अशी आली पिके..
रण चंडिके..!!

थांबू नको..टाळू नको..
आसू पुन्हा ढाळू नको..
अन्याय हा जाळावया..
तेजाब व्हावे हुंदके..
रणचंडिके..!!
~~~~
[14/10, 7:36 pm] my jio no: *मृत्युचे थैमान*
निसर्ग कोपला
पुर हा दारी आला
घरदार वाहून गेला
मृत्यू सामोरी आला॥१॥

गडगडाट ढगांचा
लखलखाट विजांचा
थयथयाट पाण्याचा
सुस्कारा श्वासांचा ॥२॥

सोसाट्याचा वारा
छप्पर नाही घरा
बेफाम हा वारा
ओघळणार्‍या अश्रुधारा ॥३॥

निर्सगाचे रौद्ररूप
अनूभवले खूप
शोधकार्याचे स्वरूप
विसरली तहानभूक ॥४॥

कशी सांगु ही व्यथा
वळवाच्या पावसाची कथा
आले दैन्य माथा
निसर्ग कोपला आता ॥५॥

सौ.मनिषा राजन कडव
२४-०७-२०२१

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*