विज्ञानाचा ध्यास

विज्ञानाचा् ध्यास

विज्ञानाचा घ्यावा ध्यास
विज्ञानाचा घ्यावा श्वास
विज्ञानात करा वास
युग हे विज्ञानाचे ॥ ध्रु ॥

कठीण श्रमाने, विज्ञानाचे घेता धड़े
अमृताचे घड़े बहु, लागतील हाती ॥ १॥

शोध कार्य करण्या, व्हावे तुम्ही अगतिक
मिळो  कीर्ति जागतिक, असो ध्येय मनी ॥ २॥

खरा गुरु आहे , विज्ञानाचा ग्रन्थ
दाखविण्या सुपंथ, सदैव हज़र ॥ ३॥

गुरु जे वदले, केले मी कथन
करावे जतन तुम्ही, ॥ ४॥



सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*