नात्याचे अंतरंग
*नात्यांचे अंतरंग*
नातं हे असतं ,
गाडल्या जाणाऱ्या बीजासारखं ...
जुळवून घ्याव लागंत त्याला मातीशी
अन झुंजाव लागत उनपावसाशी .
काळजी घ्यावी लागले कोंब फुटेपर्यन्त
अन वाट बघावी लागते
उभ रहाण्याची ताकद येइपर्यंत.
नात्याचही अगदी तसचं ,
घ्यावं लागत जुळवून गुणदोषांशी
अन लढावं लागत स्व: च्या धारणांशी
घ्यावी लागते काळजी
समज गैरसमजांची
अन ओढ बाळगावी लागते
नातं फुलण्याची .
तरच बहरतं सर्वार्थाने बी आणि नातं
आभाळाकडे झेपावत इवलंस पातं.
परंतु ,
नुसतेच बीज पेरणारे मात्र
कधीच पोहोचत नाही
त्याच्या सावलीपर्यन्त ...
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment